Join us  

Ind vs Aus 1st test live : रवींद्र जडेजा अडचणीत? Viral Video नंतर मॅच रेफरींकडून चौकशी, रोहित शर्माकडेही विचारणा 

India vs Australia 1st test live score updates  : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीचा (IND vs AUS 1st Test) पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 9:30 AM

Open in App

India vs Australia 1st test live score updates  : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीचा (IND vs AUS 1st Test) पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर पाणी मागताना दिसले. मात्र, ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय संघाला अपमानित करण्याचा डाव रचला. पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी पाच विकेट घेणाऱ्या रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja Ball Tampering)  त्याच्या बोटावर कोणता 'पदार्थ' लावत असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि ऑस्ट्रेलियन मीडियाने जडेजावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला. Ind vs aus test 

ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टने या प्रकरणाबाबत जडेजा आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांची चौकशी केली. त्यांना खेळानंतर झालेल्या घटनेचा व्हिडिओ दाखवला, परंतु कोणतीही कारवाई केली गेली नाही. रिपोर्ट्सनुसार भारतीय संघ व्यवस्थापनाने रेफ्रींना कळवले की जडेजा वेदना कमी करणारे लोशन लावत आहे.   ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here ) 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये जडेजा त्याचा सहकारी मोहम्मद सिराजकडून मलम घेत तो डाव्या बोटावर लावताना आणि घासताना दिसत आहे. यावर ऑस्ट्रेलियन मीडिया आणि माजी खेळाडू प्रश्न उपस्थित करत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने PTI ला सांगितले की हे 'बोटातील वेदना कमी करण्यासाठी मलम' आहे. Ind vs aus scorecard

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १७७ धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्माने डावाची सुरुवात आक्रमक फटकेबाजीने केली. त्याने पहिल्या षटकात तीन चौकार खेचले. नॅथन लियॉनने पुढे येत षटकार खेचून त्याने  कसोटीतील २५०वा सिक्स मारला. रोहित व लोकेश यांनी २३ षटकं खेळून काढताना ७६ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला ८ चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट मिळवली. पदार्पणवीर टॉड मर्फीने स्वतःच्याच गोलंदाजीवर लोकेश राहुलची ( २०) विकेट घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ७७ धावा केल्या आणि १०० धावांनी ते अजूनही पिछाडीवर आहेत. रोहित ६९ चेंडूंत ९ चौकार व  १ षटकारासह ५६ धावांवर नाबाद आहे. Ind vs aus scorecard, Ind vs aus live  match

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजा
Open in App