Join us  

Ind vs Aus 1st test live : १७ चेंडूंत चोपल्या ७२ धावा! रोहित शर्माच्या ऐतिहासिक खेळीचा ५ मिनिटांचा Video; विचित्र पद्धतीने झाला बाद

India vs Australia 1st test live score updates : रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना टफ फाईट दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 3:26 PM

Open in App

India vs Australia 1st test live score updates : रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना टफ फाईट दिली. एकीकडे भारताचे अन्य फलंदाज अपयशी ठरत असताना रोहितने कॅप्टन्स इनिंग्ज खेळली. त्याने शतक झळकावताना भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली अन् अनेक विक्रमही मोडले. चहापानानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला अखेर रोहितची विकेट घेण्यात यश मिळाले. नव्या चेंडूसह कमिन्स गोलंदाजीला परतला अन् त्याने वेगवान चेंडू टाकून रोहितचा त्रिफळा उडवला.  Ind vs aus scorecard, Ind vs aus live  match 

१७७ धावांचा पाठला करताना रोहित शर्मा आणि लोकेश राहुल ( २०) यांनी ७६ धावांची भागीदारी केली. नाईट वॉचमन म्हणून आलेला अश्विन ( २३) रोहितसह १०४ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी करून माघारी परतला. चेतेश्वर पुजारा ( ७), विराट कोहली ( १२), सूर्यकुमार यादव ( ८) हे झटपट माघारी परतल्यानंतर  रोहित व रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी भागीदारी करून भारताचा डाव सावरला. रोहितने १७१ चेंडूंत शतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून त्याचे हे पहिले कसोटी शतक ठरले. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून शतक  झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला.  

चहापानानंतर भारताला मोठा धक्का बसला. रोहित २१२ चेंडूंत १५ चौकार व २ षटकार खेचून १२० धावांवर बाद झाला. पॅट कमिन्सने त्याचा त्रिफळा उडवला. मर्फीने पदार्पणवीर केएस भरतची ( ८) विकेट घेतली आणि पदार्पणात डावात पाच विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा तिसरा फिरकीपटू ठरला. २००८मध्ये  जेसन क्रेझाने ८/२१५ ( वि. भारत) आणि  नॅथन लियॉनने २०११मध्ये  ५/३४ ( वि. श्रीलंका) अशी कामगिरी केली होती. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मा
Open in App