Ind vs Aus 1st test live : रवींद्र जडेजाचे जबरदस्त कमबॅक; अश्विनसह दोनशेच्या आत गुंडाळला ऑस्ट्रेलियाचा डाव, Video

India vs Australia 1st test live score updates : भारतीय संघाने नागपूर कसोटीच्या दुसऱ्या सत्रात चांगले कमबॅक केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 02:49 PM2023-02-09T14:49:19+5:302023-02-09T14:49:50+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 1st test live scorecard nagpur :Surgery in September & Five wicket haul  in February by Ravindra Jadeja, Australia 84 for 2 to 177 for 10, Video  | Ind vs Aus 1st test live : रवींद्र जडेजाचे जबरदस्त कमबॅक; अश्विनसह दोनशेच्या आत गुंडाळला ऑस्ट्रेलियाचा डाव, Video

Ind vs Aus 1st test live : रवींद्र जडेजाचे जबरदस्त कमबॅक; अश्विनसह दोनशेच्या आत गुंडाळला ऑस्ट्रेलियाचा डाव, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 1st test live score updates : भारतीय संघाने नागपूर कसोटीच्या दुसऱ्या सत्रात चांगले कमबॅक केले. रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) पाच विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले आणि त्यात अनुभवी आर अश्विन ( R Ashwin) यानेही  विकेट्स घेतल्या. सप्टेंबर महिन्यात गुडघ्यावर सर्जरी झाल्यानंतर जडेजा क्रिकेटपासून दूर होता आणि फेब्रुवारीत पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या. त्याने ११ वेळा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. जडेजाने ४७ धावांत ५, तर अश्विनने ४२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.  


 भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला ( १) पायचीत केले. मोहम्मद शमीने पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा ( १) त्रिफळा उडवला.  स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी ऑसींचा डाव सारवला. स्मिथ व लाबुशेन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला २ बाद ७६ धावा उभारून दिल्या.  India vs Australia test series , Ind vs aus scorecard

पण, लंच ब्रेकनंतर लाबुशेन ( ४९) रवींद्र जडेजाच्या फिरकीवर यष्टीचीत झाला. त्यापाठोपाठ मॅट शेनशॉ LBW झाला. जडेजाची हॅटट्रिक मात्र हुकली.  स्मिथ १०७ चेंडूंत ३७ धावा करून माघारी परतला. अॅलेक्स केरी रिव्हर्स  स्वीप मारून भारताला हैराण करत होता, परंतु अश्विनने त्याला जाळ्यात अडकवले अन् त्रिफळा उडवला. अश्विनची ही कसोटी क्रिकेटमधील ४५० वी विकेट ठरली. अनिल कुंबळे यांच्यानंतर इतक्या विकेट घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.  अश्विनने पॅट कमिन्सलाही माघारी पाठवले. चहापानाच्या ब्रेकनंतर जडेजाने आणखी एक विकेट मिळवली.  पीटर हँड्सकोम्ब ३१ धावांवर पायचीत झाला. जडेजाची ही पाचवी  विकेट ठरली. अश्विनने डाव्यातील तिसरी विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांत गुंडाळला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: India vs aus 1st test live scorecard nagpur :Surgery in September & Five wicket haul  in February by Ravindra Jadeja, Australia 84 for 2 to 177 for 10, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.