पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहलीची संयमी खेळी आणि त्याला मिळालेली चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची साजेशी साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत कमबॅक केले आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर गुंडाळल्यानंतर मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर अवघ्या 8 धावांवर माघारी परतले. मात्र, कोहलीने सुरुवातीला पुजारा आणि नंतर रहाणेसह अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाला दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 172 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी कोहली वगळता अन्य खेळाडूंना अपयश आले. भारताचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 बाद 132 धावा करून 175 धावांची आघाडी घेतली आहे.
03:25 PM
भारतीय गोलंदाजांची कमाल, ऑस्ट्रेलियाची संयमी खेळी
03:22 PM
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलिया 4 बाद 132 धावा
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात 4 बाद 132 धावा करताना 175 धावांची आघाडी घेतली आहे.
03:17 PM
उस्मान ख्वाजाचा अवघड झेल सुटला
02:50 PM
ट्राव्हीस हेडची विकेट, ऑस्ट्रेलिया 4 बाद 120 धावा
01:49 PM
ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, इशांत शर्माला यश
01:27 PM
ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज माघारी
01:11 PM
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मार्कस हॅरिस बाद
12:51 PM
अॅरोन फिंचला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले
12:32 PM
चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया बिनबाद 33 धावा, 76 धावांची आघाडी
11:57 AM
मार्कस हॅरिसला जीवदान, इशांत शर्माच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराने झेल सोडला
11:33 AM
नॅथन लियॉनने भारताचा निम्मा संघ माघारी पाठवला
11:18 AM
भारत पहिल्या डावात 43 धावांनी पिछाडीवर
11:17 AM
नॅथन लियॉनने रिषभ पंतला बाद केले
10:40 AM
रिषभ पंतला जीवदान, पॅक कमिन्सने झेल सोडला
10:35 AM
भारताचा आठवा फलंदाज माघारी, 8 बाद 254 धावा
09:49 AM
उपहारापर्यंत भारताच्या 7 बाद 252 धावा
09:48 AM
भारताला सातवा धक्का, मोहम्मद शमी बाद
09:46 AM
विराट कोहली 123 धावांवर माघारी
09:38 AM
भारताच्या 2 बाद 250 धावा
09:05 AM
भारताचा पाचवा फलंदाज माघारी, 5 बाद 233 धावा
हनुमा विहारीला जोश हॅझलवुडने केले बाद.
08:40 AM
2018 मधील 5 वे कसोटी शतक
08:38 AM
विराट कोहलीचे शतक
08:35 AM
भारताच्या दोनशे धावा, विराट कोहली शतकासमीप
08:20 AM
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे बाद
Web Title: IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाची मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.