Ind vs Aus 2nd test live : कॅप्टन मानलं तुला! चेतेश्वर पुजारासाठी 'हिटमॅन' रोहित शर्माने स्वतःची विकेट फेकली, Video 

India vs Australia 2nd test live score updates : आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने  तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात गुडघे टेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 12:47 PM2023-02-19T12:47:24+5:302023-02-19T12:48:23+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 2nd test live scorecard Delhi : A great knock by Rohit Sharma 31 in just 20 balls. He sacrificed his wickets for Cheteshwar Pujara, India 2-39 | Ind vs Aus 2nd test live : कॅप्टन मानलं तुला! चेतेश्वर पुजारासाठी 'हिटमॅन' रोहित शर्माने स्वतःची विकेट फेकली, Video 

Ind vs Aus 2nd test live : कॅप्टन मानलं तुला! चेतेश्वर पुजारासाठी 'हिटमॅन' रोहित शर्माने स्वतःची विकेट फेकली, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 2nd test live score updates : आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने  तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांवर गुंडाळला गेला. रवींद्र जडेजाने सात विकेट्स घेतल्या, तर अश्विनने तीन विकेट्स मिळवल्या. भारतीय संघानेही ६ धावांवर पहिली विकेट गमावली, परंतु कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) दमदार फटकेबाजी करून दडपण कमी केले. चांगले फटके मारत असताना रोहितने मनाचा मोठेपणा दाखवला अन् १०० वी कसोटी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारासाठी स्वतःची विकेट फेकली. 

दुर्दैवं म्हणावं तर याला! KL Rahul विचित्र पद्धतीने झाला बाद, रोहित शर्माही दिसला नाराज, Video 

 
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या २६३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. जडेजाने ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्या. अश्विनने ५९ धावांत ३ विकेट्स मिळवले. 

दीड तासात खेळ खल्लास! ९.३३ला पहिली विकेट अन्... 

  • ९.३३ वा. ट्रॅव्हिस हेड - २/६५
  • १०.०१ वा. स्टीव्ह स्मिथ - ३/८५
  • १०.१३ वा. मार्नस लाबुशेन - ४/९४ 
  • १०.२२ वा. मॅथ्यू रेनशॉ - ५/९५
  • १०.२४ वा. पीटर हँड्सकोम्ब - ६/९५
  • १०.२८ वा. पॅट कमिन्स - ७/९५
  • १०.४४ वा. अॅलेक्स केरी - ८/११०
  • १०.५५ वा. नॅथन लियॉन - ९/११३
  • ११.०१ वा. मॅथ्यू कुहनेमन - १०/११३  


११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ६ धावांवर पहिला धक्का बसला. लोकेश राहुल पुन्हा अपयशी ठरला. नॅथन लियॉनने टाकलेला चेंडू लोकेशने शॉर्ट लेगच्या दिशेने मारला. सिली पॉईंटला उभ्या असलेल्या पीटर हँड्सकोम्बच्या पायावर आदळून चेंडू यष्टिरक्षक केरीकडे गेला अन् त्याने झेल टिपला. लोकेश पुन्हा अपयशी ठरल्याने रोहित शर्माही नाराज झाला. त्यानंतर शंभरावी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजारा आला. पुजाराला पहिल्या डावात शून्य धावा करता आल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या डावात तो सावध खेळ करताना दिसला. 

दुसरीकडे रोहितने चांगले फटके मारले. ७व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहितने दोन धावसाठी फटका मारला. दुसऱ्या धावेसाठी रोहितने पुजाराला कॉल केला अन् पुजाराही पळाला. पण, खेळपट्टीच्या मधोमध येताच रोहित थांबला अन् पुजाराला मागे जाण्याचा इशारा केला. तोपर्यत पुजारा नॉन स्ट्रायकर एंडपर्यंत पोहोचला होता. पुजारा बाद होऊ नये म्हणून रोहित माघारी फिरला नाही आणि स्वतः रन आऊट झाला. रोहित २० चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. 
 


 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs aus 2nd test live scorecard Delhi : A great knock by Rohit Sharma 31 in just 20 balls. He sacrificed his wickets for Cheteshwar Pujara, India 2-39

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.