Ind vs Aus 2nd test live : ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्याच दिवशी गुंडाळला; मोहम्मद शमी, अश्विन, जडेजा यांनी पराक्रम केला

India vs Australia 2nd test live score updates  : दिल्ली कसोटीचा पहिला दिवस संतुलित राहिला. आर अश्विनन एका षटकात दोन धक्के देऊन भारताला कमबॅक करून दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 04:15 PM2023-02-17T16:15:11+5:302023-02-17T16:15:27+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 2nd test live scorecard Delhi : Australia 263 all out with Mohammed Shami 4 wickets, Ravindra Jadeja 3 wickets & R Ashwin 3 wickets.   | Ind vs Aus 2nd test live : ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्याच दिवशी गुंडाळला; मोहम्मद शमी, अश्विन, जडेजा यांनी पराक्रम केला

Ind vs Aus 2nd test live : ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्याच दिवशी गुंडाळला; मोहम्मद शमी, अश्विन, जडेजा यांनी पराक्रम केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 2nd test live score updates  : दिल्ली कसोटीचा पहिला दिवस संतुलित राहिला. आर अश्विनन एका षटकात दोन धक्के देऊन भारताला कमबॅक करून दिले होते. पण, उस्मान ख्वाजाने ( Usman Khwaja) एकहाती खिंड लढवताना भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. त्याचे शतक हुकल्यानंतर पीटर हँड्सकोम्ब व पॅट कमिन्स यांनी ऑस्ट्रेलियाला सावरले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सन्मानजनक धावसंख्या उभी केली. 

ख्वाजाचे शतक हुकले; जडेजा-अश्विनने रचला इतिहास; केएल राहुलचा अप्रतिम झेल 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नर ( १४) बाद झाला. वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांची ५० धावांची भागीदारी संपुष्टात आली. ख्वाजा रिव्हर्स स्वीप मारून भारतीय फिरकीपटूंना हैराण करताना दिसला. त्याचवेळी  आर अश्विनने एकाच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. मार्नस लाबुशेनला ( १८) पायचीत पकडल्यानंतर स्टीव स्मिथला ( ०) अश्विनने बाद केले. केएस भरतने अप्रतिम झेल घेतला. India vs Australia test series , Ind vs aus scorecard  

ख्वाजा भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवताना दिसला. आज संधी मिळालेल्या ट्रॅव्हिस हेडने त्याला साथ देण्या प्रयत्न केला, परंतु लंच ब्रेकनंतर मोहम्मद शमीने त्याला ( १२) माघारी पाठवले. ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांची सेट झालेली जोडी रवींद्र जडेजाने तोडली. ख्वाजा १२५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८१ धावा करून माघारी परतला. लोकेश राहुलने अफलातून झेल टिपला. त्यानंतर अश्विनने अॅलेक्स केरीला भोपळ्यावर माघारी पाठवले.  जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५००+ धावा आणि २५०+ विकेट्स घेण्याचा आशियाई अष्टपैलू खेळाडूचा मान पटकावला. Ind vs aus live  match 


 हँड्सकोम्ब आणि पॅट कमिन्स या जोडीने सातव्या विकेटसाठी ६० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. हँड्सकोम्बने ११० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हँड्सकोम्ब व कमिन्स यांची १२१ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी जडेजाने संपुष्टात आली. कमिन्स ३३ धावा ( ५९ चेंडूं, ३ चौकार व २ षटकार)  करून LBW झाला. त्याच षटकात जडेजाने टॉड मर्फीचा ( ०) त्रिफळा उडवला. शमीने नॅथन लियॉनचा ( १०) त्रिफळा उडवला.  जडेजाने हँड्सकोम्बची विकेट मिळवली होती, परंतु तो नो बॉल ठरला. शमीने शेवटची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव २६३ धावांवर गुंडाळला. हँड्सकोम्ब ७२ धावांवर नाबाद राहिला. शमीने चार, तर अश्विन व जडेजा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. Ind vs aus 2nd test match live score

 

Web Title: India vs aus 2nd test live scorecard Delhi : Australia 263 all out with Mohammed Shami 4 wickets, Ravindra Jadeja 3 wickets & R Ashwin 3 wickets.  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.