India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीचा पहिला दिवस संतुलित राहिला. आर अश्विनन एका षटकात दोन धक्के देऊन भारताला कमबॅक करून दिले होते. पण, उस्मान ख्वाजाने ( Usman Khwaja) एकहाती खिंड लढवताना भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. त्याचे शतक हुकल्यानंतर पीटर हँड्सकोम्ब व पॅट कमिन्स यांनी ऑस्ट्रेलियाला सावरले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सन्मानजनक धावसंख्या उभी केली.
ख्वाजाचे शतक हुकले; जडेजा-अश्विनने रचला इतिहास; केएल राहुलचा अप्रतिम झेल
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नर ( १४) बाद झाला. वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांची ५० धावांची भागीदारी संपुष्टात आली. ख्वाजा रिव्हर्स स्वीप मारून भारतीय फिरकीपटूंना हैराण करताना दिसला. त्याचवेळी आर अश्विनने एकाच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. मार्नस लाबुशेनला ( १८) पायचीत पकडल्यानंतर स्टीव स्मिथला ( ०) अश्विनने बाद केले. केएस भरतने अप्रतिम झेल घेतला. India vs Australia test series , Ind vs aus scorecard
ख्वाजा भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवताना दिसला. आज संधी मिळालेल्या ट्रॅव्हिस हेडने त्याला साथ देण्या प्रयत्न केला, परंतु लंच ब्रेकनंतर मोहम्मद शमीने त्याला ( १२) माघारी पाठवले. ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांची सेट झालेली जोडी रवींद्र जडेजाने तोडली. ख्वाजा १२५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८१ धावा करून माघारी परतला. लोकेश राहुलने अफलातून झेल टिपला. त्यानंतर अश्विनने अॅलेक्स केरीला भोपळ्यावर माघारी पाठवले. जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५००+ धावा आणि २५०+ विकेट्स घेण्याचा आशियाई अष्टपैलू खेळाडूचा मान पटकावला. Ind vs aus live match