Ind vs Aus 2nd test live : Bat first or pad first? विराट कोहलीवर अन्याय झाला? राहुल द्रविडसह सर्वच भडकले, पाहा नेमके काय घडले, Video 

India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला चार धक्के दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:27 PM2023-02-18T13:27:01+5:302023-02-18T13:29:26+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 2nd test live scorecard Delhi : Bat first or pad first? Virat Kohli dismissed for 44, Big wicket for debutant Martin Kuhnemann, This is Kohli's highest score against Australia at home in 10 years, Video  | Ind vs Aus 2nd test live : Bat first or pad first? विराट कोहलीवर अन्याय झाला? राहुल द्रविडसह सर्वच भडकले, पाहा नेमके काय घडले, Video 

Ind vs Aus 2nd test live : Bat first or pad first? विराट कोहलीवर अन्याय झाला? राहुल द्रविडसह सर्वच भडकले, पाहा नेमके काय घडले, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला चार धक्के दिले. विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरताना १२९ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. पहिल्या कसोटीत ७ विकेट्स घेणाऱ्या टॉड मर्फीनं ही जोडी तोडली. रवींद्र जडेजा ७४ चेंडूंत २६ धावांवर पायचीत झाला. त्यानंतंर पदार्पणवीर मॅथ्यू कुहनेमनने मोठी विकेट मिळवली. पण, या विकेटवरून गोंधळ सुरू झाला आहे. Ind vs aus test 

सूर्याच्या जागी श्रेयस अय्यरला घेतलं, त्याला ऑसींनी अफलातून झेल घेऊन माघारी पाठवलं, Video 

मोहम्मद शमीने चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला दणके दिले. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर गुंडाळला.  ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने १२५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८१ धावा केल्या.  त्यापाठोपाठ पीटर हँड्सकोम्बने नाबाद ७२ धावांची खेळी केली. कर्णधार पॅट कमिन्सनेही ३३ धावांचे योगदान दिले. India vs Australia test series 

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लियॉनने दबदबा राखला. दोन DRS वाया घालवल्यानंतर अखेर लियॉनला लोकेश राहुलची ( १७) विकेट मिळवण्यात यश आले. १००वी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजारा ( ०) लियॉनच्या गोलंदाजीवर LBW झाला. लियॉनने पुढच्याच षटकात रोहितचा ( ३२) त्रिफळा उडवला. कसोटीत लियॉनने सर्वाधिक ११ वेळा पुजाराला बाद केले. अजिंक्य रहाणेला १० वेळा त्याने बाद केले होते. लियॉन इथेच थांबला नाही आणि त्याने श्रेयस अय्यरलाही ( ४) हँड्सकोम्बकरवी झेलबाद केले. भारताची अवस्था बिनबाद ४६ वरून ४ बाद ६६ अशी झाली. Ind vs aus scorecard


 


विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरताना १२९ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. पहिल्या कसोटीत ७ विकेट्स घेणाऱ्या टॉड मर्फीनं ही जोडी तोडली. रवींद्र जडेजा ७४ चेंडूंत २६ धावांवर पायचीत झाला.  कुहनेमनने टाकलेल्या चेंडूवर विराटला पायचीत दिले गेले. विराटने लगेच DRS घेतला. त्यात चेंडू बॅट व पॅड यांना एकाच वेळी टच होत असल्याचे दिसले अन् Umpire Call मुळे   विराटला बाद दिले गेले. विराट ४४ धावांवर बाद झाला आणि घरच्या मैदानावरील विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटीतील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.  Ind vs aus live  match




 


 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs aus 2nd test live scorecard Delhi : Bat first or pad first? Virat Kohli dismissed for 44, Big wicket for debutant Martin Kuhnemann, This is Kohli's highest score against Australia at home in 10 years, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.