India vs Australia 2nd test live score updates : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला पाच धक्के देत बॅकफूटवर फेकले. विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरताना १२९ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आर अश्विन व अक्षर पटेल ही जोडी चमकली आणि या जोडीने आठव्या विकेटसाठी १७७ चेंडूंत ११४ धावांची मजबूत भागीदारी केली. अक्षरने ११५ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारासह ७४ धावा केल्या. अक्षर पटेलने मारलेला चेंडू ऑसी कर्णधार पॅट कमिन्सने टिपला, परंतु त्यालाही यावर विश्वास बसेना... Ind vs aus test
आर अश्विनचा 'अष्टपैलू' पराक्रम! पाच भारतीयांना जमलाय हा विक्रम; अक्षर पटेलसह सावरला डाव
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लियॉनने दबदबा राखला. त्याने लोकेश राहुल ( १७), चेतेश्वर पुजारा ( ०), रोहित शर्मा (३२) आणि श्रेयस अय्यरला ( ४) बाद केले. विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी १२९ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली आणि टॉड मर्फीनं जडेजाला ( ७४ चेंडूंत २६ धावा) बाद करून ही भागीदारी तोडली. मॅथ्यू कुहनेमनच्या चेंडूवर विराट पायचीत झाला आणि हा वादग्रस्त निर्णय ठरला. विराट ४४ धावांवर बाद झाला. केएस भरत ( ६) पुन्हा अपयशी ठरली.
Bat first or pad first? विराट कोहलीवर अन्याय झाला? राहुल द्रविडसह सर्वच भडकले, पाहा नेमके काय घडले, Video
अक्षर पटेल व अश्विन यांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवली. अश्विनने या खेळीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०००+ धावांचा पल्ला ओलांडला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०००+धावा आणि ७००+ विकेट्स घेणारा तो भारताचा पाचवा खेळाडू ठरला. अक्षरने अर्धशतकी खेळी करताना ऑसी गोलंदाजांना झोडले, दुसऱ्या बाजूने अश्विन विकेट टिकवून खेळला. पण, नवीन चेंडूवर पॅट कमिन्सने ही भागीदारी संपुष्टात आणली. अश्विन ७१ चेंडूंत ५ चौकारांसह ३७ धावांवर झेलबाद झाला. त्याने अक्षरसह ११४ धावा जोडल्या.
अक्षरने आता आक्रमक पवित्रा घेतला. टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर षटकार खेचल्यानंतर अक्षरने आणखी एक खणखणीत फटका मारला, परंतु शॉर्ट थर्ड लेगवर उभ्या असलेल्या पॅट कमिन्सने आंधळा झेल टिपला. त्याच्या हाहात चेंडू बसला अन् अक्षरला ११५ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारासह ७४ धावांवर माघारी जावे लागले. भारताचा पहिला डाव २६२ धावांवर गुंडाळून ऑसींनी १ धावेची आघाडी घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs aus 2nd test live scorecard Delhi : Can you believe it? Axar Patel was stunted by Pat Cummins's catch, India bowled out for 262, Australia with a 1 run lead, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.