India vs Australia 2nd test live score updates : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला पाच धक्के देत बॅकफूटवर फेकले. विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरताना १२९ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आर अश्विन व अक्षर पटेल ही जोडी चमकली आणि या जोडीने आठव्या विकेटसाठी १७७ चेंडूंत ११४ धावांची मजबूत भागीदारी केली. अक्षरने ११५ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारासह ७४ धावा केल्या. अक्षर पटेलने मारलेला चेंडू ऑसी कर्णधार पॅट कमिन्सने टिपला, परंतु त्यालाही यावर विश्वास बसेना... Ind vs aus test
आर अश्विनचा 'अष्टपैलू' पराक्रम! पाच भारतीयांना जमलाय हा विक्रम; अक्षर पटेलसह सावरला डाव
अक्षर पटेल व अश्विन यांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवली. अश्विनने या खेळीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०००+ धावांचा पल्ला ओलांडला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०००+धावा आणि ७००+ विकेट्स घेणारा तो भारताचा पाचवा खेळाडू ठरला. अक्षरने अर्धशतकी खेळी करताना ऑसी गोलंदाजांना झोडले, दुसऱ्या बाजूने अश्विन विकेट टिकवून खेळला. पण, नवीन चेंडूवर पॅट कमिन्सने ही भागीदारी संपुष्टात आणली. अश्विन ७१ चेंडूंत ५ चौकारांसह ३७ धावांवर झेलबाद झाला. त्याने अक्षरसह ११४ धावा जोडल्या.
अक्षरने आता आक्रमक पवित्रा घेतला. टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर षटकार खेचल्यानंतर अक्षरने आणखी एक खणखणीत फटका मारला, परंतु शॉर्ट थर्ड लेगवर उभ्या असलेल्या पॅट कमिन्सने आंधळा झेल टिपला. त्याच्या हाहात चेंडू बसला अन् अक्षरला ११५ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारासह ७४ धावांवर माघारी जावे लागले. भारताचा पहिला डाव २६२ धावांवर गुंडाळून ऑसींनी १ धावेची आघाडी घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"