Join us  

Ind vs Aus 2nd test live : संघाकडून 'Guard of Honour', सुनील गावस्करांकडून सत्कार; चेतेश्वर पुजाराला भावनिक करणारा क्षण, Video 

India vs Australia 2nd test live score updates  : भारतीय संघात श्रेयस अय्यर पतरला असून सूर्यकुमार यादवला बाहेर बसावे लागले. चेतेश्वर पुजारासाठी ( Cheteshwar Pujara 100th Test) आजची कसोटी महत्त्वाची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 10:15 AM

Open in App

India vs Australia 2nd test live score updates  : मालिकेत आघाडी घेतलेला भारतीय संघ दिल्लीत दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅमेरून ग्रीन व मिचेल स्टार्क आजच्या सामन्यातही खेळणार नाहीत. मॅट शेनशोच्या जागी आज ट्रेव्हिस हेडला संधी मिळालीय, तर बोलंडच्या जागी कुलनेमन पदार्पण करतोय. भारतीय संघात श्रेयस अय्यर पतरला असून सूर्यकुमार यादवला बाहेर बसावे लागले. चेतेश्वर पुजारासाठी ( Cheteshwar Pujara 100th Test) आजची कसोटी महत्त्वाची आहे. भारताकडून १०० कसोटी खेळणारा तो १३वा खेळाडू ठरणार आहे. 

हातात हात, सप्तपदी! हार्दिक पांड्या-नताशा स्टँकोव्हिच यांनी हिंदू पद्धतीने केलं लग्न; Photo

भारताकडून सर्वाधिक कसोटी खेळणारे खेळाडूसचिन तेंडुलकर - २००राहुल द्रविड - १६३व्ही व्ही एस लक्ष्मण - १३४अनिल कुंबळे - १३२कपिल देप - १३१सुनील गावस्कर - १२५दीलिप वेंगसरकर - ११६ सौरव गांगुली - ११३विराट कोहली - १०६*इशांत शर्मा - १०५हरभजन सिंग - १०३वीरेंद्र सेहवाग - १०३चेतेश्वर पुजारा - १०० *

अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे आणि यावेळी चेतेश्वर पुजाराचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेतेश्वर पुजाराचे वडिल व पत्नी पूजा व मुलगी उपस्थित होते. दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांच्या हस्ते पुजाराचा सत्कार केला गेला. तत्पूर्वी मैदानावर भारतीय खळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला.  “तुमच्याकडून ही कॅप मिळणे हा सन्मान आहे, तुमच्यासारख्या दिग्गजांनी मला प्रेरणा दिली (सुनील गावस्कर यांच्याकडून कॅप मिळाल्यावर). मला लहानपणी भारताकडून खेळायचे होते, पण १०० कसोटी सामने खेळेन असे कधीच वाटले नव्हते. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट हे अंतिम स्वरूप आहे, ते जीवनाप्रमाणेच तुम्हाला आव्हान देते. सर्व तरुणांना, तुम्हा सर्वांना भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करतो. मी माझी पत्नी, माझे कुटुंब, बीसीसीआयमधील सर्वांचे आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो,” असे पुजारा म्हणाला.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचेतेश्वर पुजारासुनील गावसकर
Open in App