Ind vs Aus 2nd test live : ऑस्ट्रेलियन खेळाडू घाबरले! चेतेश्वर पुजारा OUT असूनही DRS नाही घेऊ शकले, मजेशीर काहीतरी घडले 

India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 10:34 AM2023-02-18T10:34:52+5:302023-02-18T10:35:10+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 2nd test live scorecard Delhi : Cheteshwar Pujara survive, The two failed reviews earlier, definitely played a part in not taking DRS for pujara  | Ind vs Aus 2nd test live : ऑस्ट्रेलियन खेळाडू घाबरले! चेतेश्वर पुजारा OUT असूनही DRS नाही घेऊ शकले, मजेशीर काहीतरी घडले 

Ind vs Aus 2nd test live : ऑस्ट्रेलियन खेळाडू घाबरले! चेतेश्वर पुजारा OUT असूनही DRS नाही घेऊ शकले, मजेशीर काहीतरी घडले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) दोन्ही विकेट मिळवताना भारताला धक्के दिले. त्यांना १००वी कसोटी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराचीही ( Cheteshwar Pujara) विकेट मिळाली असती, परंतु ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रचंड घाबरलेले दिसले. 

सिराजच्या बाऊन्सरनं केलं बेजार, David Warner ची चालू कसोटीतून माघार; बदली खेळाडू फलंदाजीला येणार


दिल्ली कसोटीचा पहिला दिवस संतुलित राहिला. मोहम्मद शमीने चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला दणके दिले. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसअखेर २१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने १२५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८१ धावा केल्या.  त्यापाठोपाठ पीटर हँड्सकोम्बने नाबाद ७२ धावांची खेळी केली. कर्णधार पॅट कमिन्सनेही ३३ धावांचे योगदान दिले.  ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आता दिल्ली कसोटीतून बाहेर पडू शकतो आणि त्याची जागा मॅट रेनशॉला संधी मिळू शकते. वॉर्नरला दुखापत झाली आहे. हेच कारण आहे की आता त्याला कसोटी सामन्यात खेळणे खूप कठीण वाटत आहे.

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला लोकेश राहुलची विकेट मिळवण्यात यश आले. नॅथन लियॉनने ही विकेट मिळवली अन् लोकेश १७ धावांवर LBW झाला. यापूर्वी लोकेशसाठी ऑसींनी दोन DRS वाया घालवले. १००वी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजारा लियॉनच्या गोलंदाजीवर शून्यावर LBW होता. पण, मैदानावरील अम्पायरने त्याला नाबाद दिले अन् ऑसींनी DRS घेण्याचे धाडस नाही दाखवले. मात्र, रिप्ले पाहिल्यानंतर त्यांनी डोक्यावर हात मारला. पुजारा बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते. लियॉनने पुढच्याच षटकात रोहितचा ( ३२) त्रिफळा उडवला.  पुजाराला जीवदान मिळाले असले तरी लियॉनने पुढील षटकात त्याची विकेट घेतली. यावेळी ऑसींनी DRS घेतला अन् पुजारा ७ चेंडूंत शून्यावर बाद झाला. भारताला ५४ धावांत तिसरा धक्का बसला. 




सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs aus 2nd test live scorecard Delhi : Cheteshwar Pujara survive, The two failed reviews earlier, definitely played a part in not taking DRS for pujara 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.