India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीचा पहिला दिवस संतुलित राहिला. मोहम्मद शमीने चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला दणके दिले. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसअखेर २१ धावा केल्या. याही सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) अपयशी ठरला आणि आता तर तो चालू सामन्यात माघार घेण्याचा अंदाज सांगण्यात येतोय. Ind vs aus test
ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने १२५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८१ धावा केल्या.त्यापाठोपाठ पीटर हँड्सकोम्बने नाबाद ७२ धावांची खेळी केली. कर्णधार पॅट कमिन्सनेही ३३ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आता दिल्ली कसोटीतून बाहेर पडू शकतो आणि त्याची जागा मॅट रेनशॉला संधी मिळू शकते. वॉर्नरला दुखापत झाली आहे. हेच कारण आहे की आता त्याला कसोटी सामन्यात खेळणे खूप कठीण वाटत आहे.India vs Australia test series
दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मोहम्मद सिराजचा चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या हेल्मेटला लागला. मात्र, यानंतरही वॉर्नर खेळला तरी विशेष काही करू शकला नाही. वॉर्नरने ४४ चेंडूत तीन चौकारांसह १५ धावा केल्या. वॉर्नर क्षेत्ररक्षणासाठी मैदानातही आला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून माहिती दिली की, वॉर्नरची तब्येत ठीक नाही आणि तो फलंदाजी करत असताना चेंडू त्याच्या शरीरावर अनेक वेळा आदळला. त्यामुळे तो मैदानात आला नाही.Ind vs aus scorecard
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत उस्मान ख्वाजा म्हणाला, "वैद्यकीय कर्मचारी याचे मूल्यमापन करतील, जरी तो (डेव्हिड) थोडा थकला आहे. त्याला चेंडू आधी हाताला आणि नंतर डोक्यात लागला. तो मैदानात का येऊ शकला नाही. आता इथून काय करायचे ते वैद्यकीय कर्मचारी ठरवतील." ऑस्ट्रेलियन संघ त्याच्या जागी मैदानावर कंसशनचा पर्याय निवडून मॅट रेनशॉला दुसऱ्या डावात खेळवू शकतात. Ind vs aus 2nd test match live score
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"