India vs Australia 2nd test live score updates : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅमेरून ग्रीन व मिचेल स्टार्क आजच्या सामन्यातही खेळणार नाहीत. मॅट शेनशोच्या जागी आज ट्रेव्हिस हेडला संधी मिळालीय, तर बोलंडच्या जागी कुलनेमन पदार्पण करतोय. भारतीय संघात श्रेयस अय्यर पतरला असून सूर्यकुमार यादवला बाहेर बसावे लागले. चेतेश्वर पुजारासाठी ( Cheteshwar Pujara 100th Test) आजची कसोटी महत्त्वाची आहे. भारताकडून १०० कसोटी खेळणारा तो १३वा खेळाडू ठरणार आहे. India vs Australia test series , Ind vs aus scorecard
बरंच काही बरळून गेल्यानंतर चेतन शर्मांचा अखेर राजीनामा; जय शाह यांच्याकडे पाठवलं पत्र मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरसाठी LBW अपील केले आणि मैदानावरील अम्पायरने त्याला बादही दिले. पण, ऑसी सलामीवीराने लगेच DRS घेतला आणि त्यात चेंडू बॅटला घासून पॅडवर आदळल्याचे दिसले. पण, वॉर्नरला पहिली धाव २१ चेंडूनंतर घेता आली.Ind vs aus live match, Ind vs aus 2nd test match live score
उस्मान ख्वाजा व वॉर्नर यांच्यावर मोहम्मद सिराजने बाऊन्सरचा मारा केला. त्यात वॉर्नरच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली. बँडेज पट्टी बांधून खेळावे लागले. त्यानंतर सिराजच्या आणखी एक बाऊन्सर वॉर्नरच्या हेल्मेटवर आदळला. जलदगती गोलंदाजांना खेळपट्टी मदत करत असल्याचे दिसताच रोहितने शमीला पुन्हा बोलावले आणि त्याने त्याचे काम केले. शमीने टाकलेला अप्रतिम चेंडू वॉर्नरच्या बॅटला चाटून यष्टिरक्षक केएस भरतच्या हाती विसावला. वॉर्नर ( १४) व उस्मान ख्वाजा यांची ५० धावांची भागीदारी संपुष्टात आली. ख्वाजा रिव्हर्स स्वीप मारून भारतीय फिरकीपटूंना हैराण करताना दिसला. त्याचवेळी आर अश्विनने एकाच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. मार्नस लाबुशेनला ( १८) पायचीत पकडल्यानंतर स्टीव स्मिथला ( ०) अश्विनने बाद केले. केएस भरतने अप्रतिम झेल घेतला. पहिल्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा ऑसींचे ३ फलंदाज ९४ धावांवर माघारी परतले होते, परंतु ख्वाजने अर्धशतक पूर्ण केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"