Join us  

Ind vs Aus 2nd test live : आर अश्विनशी पंगा घेणे स्टीव्ह स्मिथला महागात पडले; गोलंदाजानं चतुराईने मिळवली त्याची विकेट, Video 

India vs Australia 2nd test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीतील दुसरा दिवस विराट कोहलीला वादग्रस्त बाद दिल्याने गाजला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 10:17 AM

Open in App

India vs Australia 2nd test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीतील दुसरा दिवस विराट कोहलीला वादग्रस्त बाद दिल्याने गाजला. तिसऱ्या दिवशी आर अश्विनने ( R Ashwin)  फिरकीची कमाल दाखवली. पहिल्याच षटकात अश्विनने सेट झालेल्या ट्रॅव्हिस हेडचा अडथळा  दूर केला आणि त्यानंतर स्टीव्ह स्मिथची विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला मोठा दणका दिला. या विकेटपूर्वी दोघांमध्ये चांगली टशन रंंगलेली पाहायला मिळाली होती. Ind vs aus live  match

 द्रविडसोबत गंभीर चर्चा करत होता विराट कोहली, अचानक 'ती' व्यक्ती आली अन् त्याचा मूड बदलला, Video 

भारताने पहिल्या डावात २६२ धावा केल्या होत्या. एका वेळी संघाच्या १३९ धावांवर ७ विकेट पडल्या होत्या, मात्र अक्षर पटेल आणि अश्विनने ११४ धावांची भक्कम भागीदारी केली होती. अक्षरने ७४ आणि अश्विनने ३७ धावा केल्या. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाने ६१ धावांवर १ गडी गमावला आहे आणि संघाकडे सध्या ६२ धावांची आघाडी घेतली होती. रोहितने तिसऱ्या दिवसाच पहिल षटक आर अश्विनला दिले आणि पठ्ठ्याने पहिल्याच षटकात विकेट मिळवली. ट्रॅव्हिस हेडने चौकार मारून तिसऱ्या दिवसाचे खाते उघडले, परंतु अश्विनने पुढच्याच चेंडूवर त्याला बाद केले. अश्विनने टाकलेला चेंडू खूपच खाली राहिला अन् बॅटची किनार घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावरला. केएस भरतने सुरेख झेल टिपला. हेड  ४६ चेंडूंत ४३ धावा करून माघारी परतला. Ind vs aus scorecard

स्टीव्ह स्मिथ - मार्नस लाबुशेन विरुद्ध आर अश्विन- रवींद्र जडेजा अशी टशन पाहायला मिळत होती. अश्विनच्या गोलंदाजीवर लाबुशेनने रिव्हर्स स्वीपचा उतारा शोधला. पण, त्याच प्रयत्नात LBW ची जोरदार अपील झाली अन् रोहितने DRS घेतला. पण, तो वाया गेला. पण, अश्विनने झटका दिलाच. त्याने स्मिथला ( ९) पायचीत केले. स्मिथने DRS घेतला होता आणि त्यात  तो वाचलाही असता, परंतु अम्पायर्स कॉल असल्याने त्याला माघारी जावे लागले. त्यानंतर जडेजाने लाबुशेनचा ( ३५) त्रिफळा उडवला अन् ४ बाद ९५ अशी त्यांची अवस्था झाली. India vs Australia test series 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथआर अश्विन
Open in App