India vs Australia 2nd test live score updates : ऑस्ट्रेलियाचा डाव वरचढ होत आहे, असे वाटत असताना आर अश्विनन एका षटकात दोन धक्के देऊन भारताला कमबॅक करून दिले. उस्मान ख्वाजाने ( Usman Khwaja) एकहाती खिंड लढवताना भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. पण, त्याचे शतक हुकले. रवींद्र जडेजाने त्याची विकेट घेतली आणि त्यासह पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान याचा विक्रम मोडला.
संघाकडून 'Guard of Honour', सुनील गावस्करांकडून सत्कार; चेतेश्वर पुजाराला भावनिक करणारा क्षण
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेतेश्वर पुजारासाठी ( Cheteshwar Pujara 100th Test) आजची कसोटी महत्त्वाची आहे. भारताकडून १०० कसोटी खेळणारा तो १३वा खेळाडू ठरणार आहे. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरसाठी LBW अपील केले आणि मैदानावरील अम्पायरने त्याला बादही दिले. पण, ऑसी सलामीवीराने लगेच DRS घेतला आणि त्यात चेंडू बॅटला घासून पॅडवर आदळल्याचे दिसले. पण, वॉर्नरला पहिली धाव २१ चेंडूनंतर घेता आली. शमीच्या गोलंदाजीवर वॉर्नर ( १४) बाद झाला. वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांची ५० धावांची भागीदारी संपुष्टात आली. India vs Australia test series , Ind vs aus scorecard
ख्वाजा रिव्हर्स स्वीप मारून भारतीय फिरकीपटूंना हैराण करताना दिसला. त्याचवेळी आर अश्विनने एकाच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. मार्नस लाबुशेनला ( १८) पायचीत पकडल्यानंतर स्टीव स्मिथला ( ०) अश्विनने बाद केले. केएस भरतने अप्रतिम झेल घेतला. ख्वाजाने अर्धशतक पूर्ण करताना भारतीय गोलंदाजांचा सामना केला. आज संधी मिळालेल्या ट्रॅव्हिस हेडने त्याला साथ देण्या प्रयत्न केला, परंतु लंच ब्रेकनंतर मोहम्मद शमीने त्याला ( १२) माघारी पाठवले. ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांची सेट झालेली जोडी
रवींद्र जडेजाने तोडली. ख्वाजा १२५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८१ धावा करून माघारी परतला. लोकेश राहुलने अफलातून झेल टिपला. त्यानंतर अश्विनने अॅलेक्स केरीला भोपळ्यावर माघारी पाठवले.
हँड्सकोम्ब आणि पॅट कमिन्स या जोडीने सातव्या विकेटसाठी ६० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५००+ धावा आणि २५०+ विकेट्स घेण्याचा आशियाई अष्टपैलू खेळाडूचा मान पटकावला. त्याने ६२ सामन्यांत हा पराक्रम करताना पाकिस्तानचा माजी कर्णधार
इम्रान खान ( ६४) याचा विक्रम मोडला. या विक्रमात सर इयान बॉथम ( इंग्लंड) ५५ सामन्यांसह अव्वल स्थानावर आहे. रवींद्रने इम्रानसह भारताचे दिग्गज
कपिल देव ( ६५ ) व सर रिचर्ड हॅडली ( ७०, न्यूझीलंड) यांचाही विक्रम मोडला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs aus 2nd test live scorecard Delhi : Ravindra Jadeja eclipses Imran, Kapil, Hadlee, Pollock, achieves rare double with landmark Khawaja wicket, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.