India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला तिसरा धक्काही दिला. भोपळ्यावर जीवदान मिळालेल्या चेतेश्वर पुजाराला ( Cheteshwar Pujara) ७ चेंडूंनंतर खाते न उघडताच माघारी जावे लागले. १६ चेंडूंत ८ धावांत भारताचे ३ फलंदाज माघारी परतले. लियॉनने कॅप्टन रोहित शर्माची घेतलेली विकेट सर्वांची झोप उडवणारी ठरली. Ind vs aus test
मोहम्मद शमीने चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला दणके दिले. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने १२५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८१ धावा केल्या. त्यापाठोपाठ पीटर हँड्सकोम्बने नाबाद ७२ धावांची खेळी केली. कर्णधार पॅट कमिन्सनेही ३३ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लियॉनने दबदबा राखला. दोन DRS वाया घालवल्यानंतर अखेर लियॉनला लोकेश राहुलची ( १७) विकेट मिळवण्यात यश आले. India vs Australia test series
१००वी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजारा लियॉनच्या गोलंदाजीवर शून्यावर LBW होता. पण, DRS चे अंदाज चुकल्याने त्यांनी यावेळी ते धाडस नाही दाखवले, परंतु रिप्लेत पुजारा बाद असल्याचे स्पष्ट दिसले. लियॉनने पुढच्याच षटकात रोहितचा ( ३२) त्रिफळा उडवला. पुजाराला जीवदान मिळाले असले तरी लियॉनने पुढील षटकात त्याची विकेट घेतली. यावेळी ऑसींनी DRS घेतला अन् पुजारा ७ चेंडूंत शून्यावर बाद झाला. भारताला ५४ धावांत तिसरा धक्का बसला. कसोटीत लियॉनने सर्वाधिक ११ वेळा पुजाराला बाद केले. अजिंक्य रहाणेला १० वेळा त्याने बाद केले होते. Ind vs aus scorecard
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs aus 2nd test live scorecard Delhi : Rohit Sharma is cleaned up by Nathan Lyon for 32 runs, KL Rahul & Cheteshwar Pujara also gone, India 3 for 54 runs,Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.