Ind vs Aus 2nd test live : टाटा, बाय-बाय, खतम! रवींद्र जडेजाने ७, तर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या; ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे

India vs Australia 2nd test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 11:05 AM2023-02-19T11:05:11+5:302023-02-19T11:05:30+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 2nd test live scorecard Delhi : Seven wicket haul for Ravindra Jadeja, R Ashwin takes 3; India need 115 to win the 2nd Test and lead the series by 2-0. | Ind vs Aus 2nd test live : टाटा, बाय-बाय, खतम! रवींद्र जडेजाने ७, तर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या; ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे

Ind vs Aus 2nd test live : टाटा, बाय-बाय, खतम! रवींद्र जडेजाने ७, तर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या; ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 2nd test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. आर अश्विनने ( R Ashwin) पहिल्याच षटकात विकेट घेतली आणि त्यानंतर रवींद्र जडेजासोबत मिळून कांगारूंची दाणादाण उडवली. रवींद्र जडेजाने सात विकेट्स घेतल्या, तर अश्विनने तीन विकेट्स मिळवल्या. 

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या २६३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा केल्या. एका वेळी संघाच्या १३९ धावांवर ७ विकेट पडल्या होत्या, मात्र अक्षर पटेल ( ७४)  आणि अश्विनने ( ३७) ११४ धावांची भक्कम भागीदारी केली. रोहितने तिसऱ्या दिवसाच पहिल षटक आर अश्विनला दिले आणि पठ्ठ्याने पहिल्याच षटकात विकेट मिळवली. ट्रॅव्हिस हेडने चौकार मारून तिसऱ्या दिवसाचे खाते उघडले, परंतु अश्विनने पुढच्याच चेंडूवर त्याला बाद केले. हेड ४६ चेंडूंत ४३ धावा करून माघारी परतला. 

स्टीव्ह स्मिथ - मार्नस लाबुशेन विरुद्ध आर अश्विन- रवींद्र जडेजा अशी टशन पाहायला मिळत होती. अश्विनच्या गोलंदाजीवर लाबुशेनने रिव्हर्स स्वीपचा उतारा शोधला. अश्विनने स्मिथला ( ९) पायचीत केले. डेव्हिड वॉर्नरच्या जागी संघात खेळणाऱ्या मॅट रेनशॉ ( २) यालाही अश्विनने पायचीत केले. पहिल्या डावात भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या पीटर हँड्सकोम्बला ( ०) जडेजाने स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराटकडे झेल देण्यास भाग पाडले. पुढच्याच चेंडूवर जडेजाने ऑसी कर्णधार पॅट कमिन्सचा त्रिफळा उडवला.  २२व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अश्विनने विकेट घेतली आणि त्यानंतर जडेजाने २३व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर विकेट घेतल्या.  
 
अॅलेक्स केरी व नॅथन लियॉन यांनी थोडा वेळ खेळपट्टीवर घालवला, परंतु चुकीचा फटका मारण्याच्या प्रयत्नात केरी त्रिफळाचीत झाला. रवींद्र जडेजाने डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. नॅथन लियॉनचाही जडेजाने त्रिफळा उडवला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११४ धावांवर गडगडला. भारताला विजयासाठी ११५ धावा करायच्या आहेत. जडेजाने ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्या. अश्विनने ५९ धावांत ३ विकेट्स मिळवले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs aus 2nd test live scorecard Delhi : Seven wicket haul for Ravindra Jadeja, R Ashwin takes 3; India need 115 to win the 2nd Test and lead the series by 2-0.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.