India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला चार धक्के दिले. सूर्यकुमार यादवच्या जागी पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये परतलेल्या श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) फार कमाल दाखवता आली नाही. शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या पीटर हँड्सकोम्बने अफलातून कॅच घेतला. Ind vs aus test
ऑस्ट्रेलियन खेळाडू घाबरले! चेतेश्वर पुजारा OUT असूनही DRS नाही घेऊ शकले, मजेशीर काहीतरी घडले
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लियॉनने दबदबा राखला. दोन DRS वाया घालवल्यानंतर अखेर लियॉनला लोकेश राहुलची ( १७) विकेट मिळवण्यात यश आले.१००वी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजारा लियॉनच्या गोलंदाजीवर शून्यावर LBW होता. पण, DRS चे अंदाज चुकल्याने त्यांनी यावेळी ते धाडस नाही दाखवले, परंतु रिप्लेत पुजारा बाद असल्याचे स्पष्ट दिसले. लियॉनने पुढच्याच षटकात रोहितचा ( ३२) त्रिफळा उडवला. पुजाराला जीवदान मिळाले असले तरी लियॉनने पुढील षटकात त्याची विकेट घेतली. यावेळी ऑसींनी DRS घेतला अन् पुजारा ७ चेंडूंत शून्यावर बाद झाला. भारताला ५४ धावांत तिसरा धक्का बसला. कसोटीत लियॉनने सर्वाधिक ११ वेळा पुजाराला बाद केले. अजिंक्य रहाणेला १० वेळा त्याने बाद केले होते. Ind vs aus scorecard
शंभराव्या कसोटीत शून्यावर बाद होणारे खेळाडू
- दीलिप वेंगसरकर वि. न्यूझीलंड ( १९८८)
- अॅलेन बॉर्डर वि. वेस्ट इंडिज ( १९८८)
- कर्टनी वॉल्श वि. इंग्लंड ( १९९८)
- मार्क टेलर वि. इंग्लंड ( १९९८)
- स्टीफन फ्लेमिंग वि. दक्षिण आफ्रिका ( २००६)
- एलिस्टर कुक वि. ऑस्ट्रेलिया ( २०१३)
- ब्रेंडन मॅक्युलम वि. ऑस्ट्रेलिया ( २०१६)
- चेतेश्वर पुजारा वि. ऑस्ट्रेलिया ( २०२३ )
लियॉन इथेच थांबला नाही आणि त्याने श्रेयस अय्यरलाही ( ४) हँड्सकोम्बकरवी झेलबाद केले. भारताची अवस्था बिनबाद ४६ वरून ४ बाद ६६ अशी झाली. २६व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अय्यरने जोरदार फटका मारला. शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या पीटर हँड्सकोम्बच्या पोटावर चेंडू आदळला, त्यानंतरही त्याने चेंडू पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता आणि त्याला यश आले.
मोहम्मद शमीने चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला दणके दिले. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने १२५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८१ धावा केल्या. त्यापाठोपाठ पीटर हँड्सकोम्बने नाबाद ७२ धावांची खेळी केली. कर्णधार पॅट कमिन्सनेही ३३ धावांचे योगदान दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"