Ind vs Aus 2nd test live : चेतेश्वर पुजाराचा शतकी सामना, ऑस्ट्रेलियाकडून 'जड्डू'चे पदार्पण; भारतीय संघात एक बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन 

India vs Australia 2nd test live score updates  : मालिकेत आघाडी घेतलेला भारतीय संघ दिल्लीत दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 09:06 AM2023-02-17T09:06:43+5:302023-02-17T09:07:16+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 2nd test live scorecard Delhi : Shreyas Iyer in & Suryakumar Yadav out, Cheteshwar Pujara 100th Test, Matthew Kuhnemann debut for Australia, Australia have won the toss and will bat first,  | Ind vs Aus 2nd test live : चेतेश्वर पुजाराचा शतकी सामना, ऑस्ट्रेलियाकडून 'जड्डू'चे पदार्पण; भारतीय संघात एक बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन 

Ind vs Aus 2nd test live : चेतेश्वर पुजाराचा शतकी सामना, ऑस्ट्रेलियाकडून 'जड्डू'चे पदार्पण; भारतीय संघात एक बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 2nd test live score updates  : मालिकेत आघाडी घेतलेला भारतीय संघ दिल्लीत दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. ही कसोटी जिंकून आयसीसी क्रमवारीत नंबर वन बनण्याचे लक्ष्य आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी दावेदारी मजबूत करण्याचे ध्येय रोहित शर्मा अँड टीमचे आहे. चेतेश्वर पुजारासाठी ( Cheteshwar Pujara 100th Test) आजची कसोटी महत्त्वाची आहे. भारताकडून १०० कसोटी खेळणारा तो १३वा खेळाडू ठरणार आहे.

भारताकडून सर्वाधिक कसोटी खेळणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर - २००
राहुल द्रविड - १६३
व्ही व्ही एस लक्ष्मण - १३४
अनिल कुंबळे - १३२
कपिल देप - १३१
सुनील गावस्कर - १२५
दीलिप वेंगसरकर - ११६
 सौरव गांगुली - ११३
विराट कोहली - १०६*
इशांत शर्मा - १०५
हरभजन सिंग - १०३
वीरेंद्र सेहवाग - १०३
चेतेश्वर पुजारा - १०० *

 

ऑस्ट्रेलियाकडून जड्डूचे पदार्पण
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीसाठी मॅट कुहनेमन ( Matt Kuhnemann) या डावखुऱ्या फिरकीपटूला पदार्पणाची संधी दिली. क्विन्सलँड क्लबच्या या खेळाडूला मार्नस लाबुशेनने पदार्पणाची कॅप दिली. विशेष म्हणजे मॅटला 'जड्डू' या टोपण नावाने ओळखले जाते. त्याने ४ वन डे सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३५ आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये ४३ विकेट्स आहेत.  

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅमेरून ग्रीन व मिचेल स्टार्क आजच्या सामन्यातही खेळणार नाहीत. मॅट शेनशोच्या जागी आज ट्रेव्हिस हेडला संधी मिळालीय, तर बोलंडच्या जागी कुलनेमन पदार्पण करतोय. 

श्रेयस अय्यरचे पुनरागमन
दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकावे लागल्यानंतर श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer) आजच्या सामन्यात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सुर्यकुमार यादवला संघाबाहेर बसावे लागले.

भारताचा संघ- रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा,  शुभमन गिल, श्रेयस अय्यर, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs aus 2nd test live scorecard Delhi : Shreyas Iyer in & Suryakumar Yadav out, Cheteshwar Pujara 100th Test, Matthew Kuhnemann debut for Australia, Australia have won the toss and will bat first, 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.