Join us  

Ind vs Aus 2nd test live : १ धाव अन् ४ विकेट्स! भारताची हॅटट्रिक; आर अश्विन, रवींद्र जडेजा यांच्यासमोर ऑसींची दाणादाण, Video 

India vs Australia 2nd test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 10:39 AM

Open in App

India vs Australia 2nd test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. आर अश्विनने ( R Ashwin) पहिल्याच षटकात विकेट घेतली आणि त्यानंतर रवींद्र जडेजासोबत मिळून कागांरूंची दाणादाण उडवली. या दोघांमुळे भारताने हॅटट्रिक साजरी केली. २२व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अश्विनने विकेट घेतली आणि त्यानंतर जडेजाने २३व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने १ धावेत ४ विकेट्स गमावल्या. India vs Australia test series 

आर अश्विनशी पंगा घेणे स्टीव्ह स्मिथला महागात पडले; गोलंदाजानं चतुराईने मिळवली त्याची विकेट, Video 

भारताने पहिल्या डावात २६२ धावा केल्या होत्या. एका वेळी संघाच्या १३९ धावांवर ७ विकेट पडल्या होत्या, मात्र अक्षर पटेल आणि अश्विनने ११४ धावांची भक्कम भागीदारी केली होती. अक्षरने ७४ आणि अश्विनने ३७ धावा केल्या. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाने ६१ धावांवर १ गडी गमावला आहे आणि संघाकडे सध्या ६२ धावांची आघाडी घेतली होती. रोहितने तिसऱ्या दिवसाच पहिल षटक आर अश्विनला दिले आणि पठ्ठ्याने पहिल्याच षटकात विकेट मिळवली. ट्रॅव्हिस हेडने चौकार मारून तिसऱ्या दिवसाचे खाते उघडले, परंतु अश्विनने पुढच्याच चेंडूवर त्याला बाद केले. अश्विनने टाकलेला चेंडू खूपच खाली राहिला अन् बॅटची किनार घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावरला. केएस भरतने सुरेख झेल टिपला. हेड  ४६ चेंडूंत ४३ धावा करून माघारी परतला. Ind vs aus scorecard

स्टीव्ह स्मिथ - मार्नस लाबुशेन विरुद्ध आर अश्विन- रवींद्र जडेजा अशी टशन पाहायला मिळत होती. अश्विनच्या गोलंदाजीवर लाबुशेनने रिव्हर्स स्वीपचा उतारा शोधला. पण, त्याच प्रयत्नात LBW ची जोरदार अपील झाली अन् रोहितने DRS घेतला. पण, तो वाया गेला. पण, अश्विनने झटका दिलाच. त्याने स्मिथला ( ९) पायचीत केले. स्मिथने DRS घेतला होता आणि त्यात  तो वाचलाही असता, परंतु अम्पायर्स कॉल असल्याने त्याला माघारी जावे लागले. डेव्हिड वॉर्नरच्या जागी संघात खेळणाऱ्या मॅट रेनशॉ ( २) यालाही अश्विनने पायचीत केले. Ind vs aus live  match

 

पहिल्या डावात भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या पीटर हँड्सकोम्बला ( ०) जडेजाने स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराटकडे झेल देण्यास भाग पाडले. ऑसींनी ९६ धावांवर ६ फलंदाज गमावले. पुढच्याच षटकात जडेजाने ऑसी कर्णधार पॅट कमिन्सचा त्रिफळा उडवला.  Ind vs aus 2nd test match live score

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआर अश्विनरवींद्र जडेजा
Open in App