India vs Australia 2nd test live score updates : आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेने जात आहे. रवींद्र जडेजाने सात आणि आर अश्विनने तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांवर गुंडाळला. भारतीय संघानेही ६ धावांवर पहिली विकेट गमावली, परंतु कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) दमदार फटकेबाजी करून दडपण कमी केले. त्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) दमदार खेळ करताना वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.
कॅप्टन मानलं तुला! चेतेश्वर पुजारासाठी 'हिटमॅन' रोहित शर्माने स्वतःची विकेट फेकली, Video
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या २६३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. जडेजाने ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्या. अश्विनने ५९ धावांत ३ विकेट्स मिळवले. ११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ६ धावांवर पहिला धक्का बसला. लोकेश राहुल पुन्हा अपयशी ठरला. लोकेश पुन्हा अपयशी ठरल्याने रोहित शर्माही नाराज झाला. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा सावध खेळ करताना दिसला. दुसरीकडे रोहितने चांगले फटके मारले. ७व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहितने दोन धावसाठी फटका मारला. दुसऱ्या धावेसाठी रोहितने पुजाराला कॉल केला अन् पुजाराही पळाला. पुजारा बाद होऊ नये म्हणून रोहित माघारी फिरला नाही आणि स्वतः रन आऊट झाला. रोहित २० चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. India vs Australia test series विराटने पुजारासह डाव सावरला अन् आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत ( Innings) मध्ये २५ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज तो ठरला. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकचा विक्रम मोडला. विराटने ५४९ डावांत हा टप्पा ओलांडला. सचिनला ५७७ डाव खेळावे लागले होते. शिवाय वयाच्या ३४ पर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्याने रिकी पाँटिंगचा २४१९३ धावांचा विक्रम मोडला. Ind vs aus scorecard, Ind vs aus live match
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"