India vs Australia 2nd test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीतील दुसरा दिवस विराट कोहलीला वादग्रस्त बाद दिल्याने गाजला. चेंडू बॅट अन् पॅडला एकाच वेळी आदळूनही अम्पायरने त्याला पायचीत दिले. नियमानुसार फलंदाजाला बेनिफिट ऑफ डाऊट मिळायला हवा होता, परंतु तसे नाही झाले. या निर्णयानंतर विराटच नव्हे तर टीम स्टाफची वैतागला होता. ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर विराटने त्याच्या विकेटची रिप्ले पाहिला आणि तोही संतापला. याच विषयावर तो मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडशी चर्चा करत होता. त्याच वेळी एक व्यक्ती विराटजवळ आली अन् त्याचा मूड बदलला. हे पाहून द्रविडलाही हसू आवरेनासे झाले. India vs Australia test series
Bat first or pad first? विराट कोहलीवर अन्याय झाला? राहुल द्रविडसह सर्वच भडकले, पाहा नेमके काय घडले, Video
दिल्लीतील लोकांना छोटे भटुरे प्रचंड आवडतात आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला हा भटुरे किती आवडतो हे त्याच्या जुन्या मुलाखतीत पाहिले आहे. कोहलीने जगातील प्रत्येक आवडता पदार्थ खाल्ला आहे, पण दिल्लीतील राम के छोले भटुरे अजूनही त्याचा आवडता पदार्थ आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारतीय फलंदाज राहुल द्रविडशी गंभीर चर्चा करतोय आणइ दरम्यान, छोले भटुरे येताच विराटने टाळ्या वाजवल्या आणि खूप आनंद झाला. हे पाहून राहुल द्रविडही हसायला लागला. Ind vs aus live match
चाहत्यांनी हा व्हिडिओ लगेच व्हायरल केला, त्यानंतर आता छोले भटुरे ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. झोमॅटोनेही छोले भटुरेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दुसरा दिवस विराट कोहलीसाठी फारसा खास नव्हता. तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण पहिल्या डावात ४४ धावांवर बाद झाला. भारताने पहिल्या डावात २६२ धावा केल्या होत्या. एका वेळी संघाच्या १३९ धावांवर ७ विकेट पडल्या होत्या, मात्र अक्षर पटेल आणि अश्विनने ११४ धावांची भक्कम भागीदारी केली होती. अक्षरने ७४ आणि अश्विनने ३७ धावा केल्या. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाने ६१ धावांवर १ गडी गमावला आहे आणि संघाकडे सध्या ६२ धावांची आघाडी आहे.Ind vs aus scorecard
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs aus 2nd test live scorecard Delhi : Virat Kohli's reaction after 'special food delivery' changes his mood after controversial wicket, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.