India vs Australia 2nd test : भारतीय संघाने आणखी एक कसोटी तीन दिवसांत जिंकली. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. पहिल्या डावात अक्षर पटेलने फलंदाजीत कमाल करून दाखवली. चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेऊन भारताने बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे राखली. भारताने सलग चौथ्यांदा ही ट्रॉफी स्वतःकडे राहून इतिहास घडवला. पण, या दोन्ही कसोटीत सलामीवीर लोकेश राहुल अपयशी ठरला. त्याने दोन कसोटींत २०, १७ व १ अशी खेळी केली. त्यामुळे उर्वरित दोन कसोटीत त्याला डच्चू देण्याची मागणी होत आहे. त्यादृष्टीने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी केलेलं विधान महत्त्वाचं ठरतंय.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या २६३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. जडेजाने ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्या. अश्विनने ५९ धावांत ३ विकेट्स मिळवले. ११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने २० चेंडूंत ३१ धावा केल्या. विराटने २० धावा केल्या. श्रेयस अय्यर १२ धावांवर बाद झाला. पुजारा ३१ आणि भरत २३ धावांवर नाबाद राहिले आणि भारताने ६ विकेट्सने हा सामना जिंकला.
राहुल द्रविड म्हणाला, आम्ही लोकश राहुलच्या पाठिशी उभे आहोत. प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दित अशी परिस्थिती येते. त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अन्य देशांत शतक झळकावली आहेत.
रोहितनेही लोकेश राहुलला संधी देणार असल्याचे स्पष्ट केले. तो म्हणाला, आम्ही लोकेशला बॅकिंग देणार आहोत. त्याच्यात क्षमता आहे. अशा खेळपट्टीवर धावा करण्याचं मेथड तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आम्ही एकाद्या खेळाडूच्या कामगिरीपेक्षा संघाची कामगिरी कशी झाली यावर लक्ष देत आहोत. लोकेश राहुलबद्दल हे माझे मत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"