India vs Australia 3rd test live score updates : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करून दाखवली. भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ मोठी आघाडी घेईल असे वाटत होते. पीटर हँड्सकोम्ब व कॅमेरून ग्रीन यांनी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात चांगला संघर्ष केला, परंतु ड्रिंक्स ब्रेकनंतर त्यांचा डाव गडगडला. गोलंदाजीत बदल करणे भारताच्या पथ्यावर पडले. उमेश यादव ( Umesh Yadav) आणि आर अश्विन ( R Ashwin) यांनी ११ धावांत ऑसींच्या ६ फलंदाजांना माघारी पाठवले. ३४ चेंडूंत कागांरूंचा खेळ खल्लास झाला.
वडिलांवर अंत्यसंस्कार करून मैदानावर पतरला; स्टार्क-मर्फीचा त्रिफळा उडवून उमेश यादवने मोठा विक्रम नोंदवला, Video
भारतीय संघाला पहिल्या डावात १०९ धावाच करता आल्या. मॅथ्यू कुहनेमन याने १६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. नॅथन लियॉनने तीन, तर टॉड मर्फीने १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात ट्रॅव्हीस हेड ( ९) लगेच माघारी परतला. उस्मान ख्वाज ( ६०) आणि मार्नस लाबुसेन ( ३१) यांनी ९६ धावांची भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथ ३८ चेंडूंत २६ धावा करून माघारी परतला. पीटर हँड्सकोम्ब ( १९) व कॅमेरून ग्रीन (२१) हे दुसऱ्या दिवशी खिंड लढवत होते. त्यांनी पहिल्या सत्रातील ड्रींक्स ब्रेकपर्यंत ३० धावा जोडल्या. पण, त्यानंतर रोहितने गोलंदाजीला आर अश्विनला आणले आणि फिरकीपटूने कमाल केली. ४ बाद १८६ वरून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर गडगडला. त्यांनी ८८ धावांचीच आघाडी घेतली
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs aus 3rd test live scorecard Indore : 34 balls, 11 runs, 6 wickets: India's incredible comeback with the ball, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.