Join us  

Ind vs Aus 3rd test live : १२ धावांत ६ विकेट्स! उमेश यादव अन् आर अश्विन यांनी कमाल केली; कांगारूंची दैना झाली, Video 

India vs Australia 3rd test live score updates : भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन या जोडीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 11:13 AM

Open in App

India vs Australia 3rd test live score updates : भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन या जोडीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती आणि त्यांना अन्य फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली. रवींद्र जडेजाने पहिल्या दिवसअखेर ऑसींच्या चार फलंदाजांना माघारी पाठवले. पीटर हँड्सकोम्ब व कॅमेरून ग्रीन हे दुसऱ्या दिवशी खिंड लढवत होते. पण, गोलंदाजीत बदल करणे भारताच्या पथ्यावर पडले. ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज  १२ धावा करून माघारी परतले.

 भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन जीवदान मिळूनही रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला. शुबमन गिल ( २१),  चेतेश्वर पुजारा ( १) व श्रेयस अय्यर ( ०) हेही माघारी परतले. विराट कोहली व केएस भरत यांनी २५ धावांची भागीदारी केली.  विराट ५२ चेंडूंत २२ धावांवर LBW झाला. बघता बघता भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गडगडला. विराटने सर्वाधिक २२, गिलने २१ आणि केएस भरतने १७ धावा केल्या. मॅथ्यू कुहनेमन याने १६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. नॅथन लियॉनने तीन, तर टॉड मर्फीने १ विकेट घेतली.

ट्रॅव्हीस हेड ( ९) व उस्मान ख्वाज यांनी सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु रवींद्र जडेजाने धक्का दिला. ख्वाजा आणि मार्नस लाबुसेन यांनी ९६ धावांची भागीदारी केली. लाबुशेन ९१ चेंडूंत ३१ धावांवर त्रिफळाचीत झाला.  ख्वाजा १४७ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ६० धावांवर बाद झाला. स्टीव्ह स्मिथ ३८ चेंडूंत २६ धावा करून माघारी परतला.  पीटर हँड्सकोम्ब व कॅमेरून ग्रीन हे दुसऱ्या दिवशी खिंड लढवत होते. त्यांनी पहिल्या सत्रातील ड्रींक्स ब्रेकपर्यंत ३० धावा जोडल्या. पण, त्यानंतर रोहितने गोलंदाजीला आर अश्विनला आणले आणि फिरकीपटूने कमाल केली. हँड्सकोमब्ला ( १९) त्याने पायचीत केले. त्यानंतर उमेश यादवने एकाच षटकात कॅमेरून ग्रीन ( २१) व मिचेल स्टार्क ( १) यांना बाद केले. उमेशने स्टार्कसाच त्रिफळा उडवला.

अश्विनने पुढील षटकात अॅलेक्स केरीला ( ३) पायचीत पकडले. सामना अचानक भारताच्या बाजूने फिरला. उमेशने टॉड मर्फीचा त्रिफळा उडवला. उमेशने घरच्या मैदानावर १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. ४ बाद १८६ वरून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर गडगडला. त्यांनी ८८ धावांचीच आघाडी घेतली

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआर अश्विन
Open in App