Ind vs Aus 3rd test live : ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकली; रोहित शर्माचे सर्व डावपेच चुकले, स्टीव्ह स्मिथ पडला भारी

India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत अडीच दिवसात भारतावर विजय मिळवण्याचा पराक्रम केला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 10:49 AM2023-03-03T10:49:50+5:302023-03-03T10:51:15+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 3rd test live scorecard Indore : Australia have defeated India by 9 wickets in the 3rd Test, Australia have qualified for the WTC Final. | Ind vs Aus 3rd test live : ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकली; रोहित शर्माचे सर्व डावपेच चुकले, स्टीव्ह स्मिथ पडला भारी

Ind vs Aus 3rd test live : ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकली; रोहित शर्माचे सर्व डावपेच चुकले, स्टीव्ह स्मिथ पडला भारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत अडीच दिवसात भारतावर विजय मिळवण्याचा पराक्रम केला. पहिल्या दोन कसोटींत हार पत्करलेला ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक करताना ९ विकेट्सने इंदूर कसोटी जिंकून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत १-२ अशी पिछाडी कमी केली. भारताचे ७६ धावांचे लक्ष्य ऑसींनी सहज पार केले.  

अश्विन 'अन्ना'ची धास्ती! मार्नस लाबुशेनने सुरू केला माईंड गेम, रोहित अन् अम्पायरने दिली समज, Video 


भारतीय संघाला पहिल्या डावात १०९ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात  ४ बाद १८६ वरून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर गडगडला. त्यांना ८८ धावांचीच आघाडी घेता आली. रवींद्र जडेजा ( ४-७८), आर अश्विन ( ३-४४) आणि उमेश यादव ( ३-१२) यांनी उल्लेखनीय गोलंदाजी केली. भारताची दुसऱ्या डावातही सुरुवात काही खास झाली नाही. शुभमन गिल ( ५), रोहित शर्मा (१२), विराट कोहली ( १३), रवींद्र जडेजा ( ७) हे अपयशी ठरले. चेतेश्वर पुजाराने ५९ धावांची खेळी करून खिंड लढवली. भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर गडगडला. नॅथन लाएनने २३.३-१-६४-८ अशी गोलंदाजी केली.


हे लक्ष्य सोपं नक्कीच नसेल याची कल्पना ऑस्ट्रेलियाला होती. त्यात आर अश्विनने नव्या चेंडू चांगलाच वळवला अन् दुसऱ्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद केले. अश्विनने टाकलेला चेंडू वळला अन् बॅटला घासून यष्टिरक्षक केएस भरतच्या हाती विसावला. १०व्या षटकात मार्नस लाबुशेन व आर अश्विन यांच्यात माईंड गेम सुरू झाला. अश्विन गोलंदाजीला आला असताना लाबुशेन टाईमपास करू लागला आणि त्याने अश्विन वैतागला. अम्पायर व रोहित शर्मा त्याला समजावण्यासाठी आले. त्यानंतर अश्विननेही गोलंदाजीसाठी मोठा रन अप घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याची ही कृती पाहून प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला. 


पण, त्यानंतर ट्रॅव्हिस हेड व लाबुशेन यांनी आक्रमक फटकेबाजी सुरू केली आणि पटापट धावा केल्या. हेड व लाबुशेन ८८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना वन डे स्टाईल धावा जोडल्या. हेड पदलालित्य दाखवताना अश्विनला पुढे येऊन जोरदार फटके मारत होता. त्याने ५३ चेंडूंत नाबाद ४९ धावा केल्या. लाबुशेनने नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत १ बाद ७८ धावा करून तिसरी कसोटी जिंकली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: India vs aus 3rd test live scorecard Indore : Australia have defeated India by 9 wickets in the 3rd Test, Australia have qualified for the WTC Final.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.