Ind vs Aus 3rd test live : रोहित शर्माने अखेर कठोर निर्णय घेतला, KL Rahulसह आणखी एकाला बाकावर बसवले; टॉस जिंकला

India vs Australia 3rd test live score updates  : भारतीय संघ बॉर्डर- गावसकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीत बुधवारी होळकर मैदानावर उतरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 09:05 AM2023-03-01T09:05:33+5:302023-03-01T09:07:11+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 3rd test live scorecard Indore : India have won the toss and will BAT first; Shubman Gill, Umesh Yadav replaces KL Rahul, Mohmmed Shami in the India X1. | Ind vs Aus 3rd test live : रोहित शर्माने अखेर कठोर निर्णय घेतला, KL Rahulसह आणखी एकाला बाकावर बसवले; टॉस जिंकला

Ind vs Aus 3rd test live : रोहित शर्माने अखेर कठोर निर्णय घेतला, KL Rahulसह आणखी एकाला बाकावर बसवले; टॉस जिंकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 3rd test live score updates  : भारतीय संघ बॉर्डर- गावसकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीत बुधवारी होळकर मैदानावर उतरेल तेव्हा घरच्या मैदानावर सलग १६ व्या मालिका विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC Final ) अंतिम सामन्यात धडक देण्याचे संघाचे प्रयत्न असणार आहेत. ही कसोटी जिंकून भारतीय संघाला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावता येणार आहे आणि तीनही फॉरमॅटमध्ये नंबर वन असलेला तो आशियातील पहिला संघ ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेत मुसंडी मारण्याच्या इराद्याने खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 


भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने पाच दिवसांच्या खेळात जिंकून बॉर्डर- गावसकर ट्रॉफीवर ताबा मिळवला. आजच्या सामन्यात लोकेश राहुल की शुभमन गिल ही उत्सुकता आहे. काल नेट्समध्ये दोन्ही फलंदाजांनी कसून सराव केला. फिरकीपटूंचे वर्चस्व असलेल्या या मालिकेत एकमेव शतक ठोकले ते रोहित शर्माने. रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी त्रिकुटाने गडी बाद करण्यासह शानदार धावाही काढल्या आहेत. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करणार आहे. 


- या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱ्या फलंदाजांनी निराश केले आहे. त्यांनी ११.५२च्या सरासरीने २४२ धावा केल्या आहेत आणि २१ वेळा विकेट फेकल्या आहेत. त्याउलट भारताच्या डावखुऱ्या फलंदाजांनी ६३.५०च्या सरासरीने २५४ धावा केल्या आहेत.  

- भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी येथे झालेल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांचेच पारडे जड राहिले आहे. अपेक्षित लोकेश राहुलला बाकावर बसवले गेले असून शुभमन गिलची एन्ट्री झाली आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली असून उमेश यादव आज खेळणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: India vs aus 3rd test live scorecard Indore : India have won the toss and will BAT first; Shubman Gill, Umesh Yadav replaces KL Rahul, Mohmmed Shami in the India X1.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.