Join us  

Ind vs Aus 3rd test live : दैव देते आणि कर्म नेते! रवींद्र जडेजानेही केली चूक, भारताचे ७ फलंदाज ८२ धावांत तंबूत, Video 

India vs Australia 3rd test live score updates :  तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 11:26 AM

Open in App

India vs Australia 3rd test live score updates :  तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. भारताचे ५ फलंदाज ४५ धावांत त्यांनी माघारी पाठवले. रोहित शर्माला पहिल्या षटकात दोन जीवदान मिळूनही त्याने घाई केली अन् विकेट फेकली. त्यानंतर धडाधड लाईनच लागली. विराट कोहली आणि केएस भर यांनी भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु टॉड मर्फीच्या चेंडूने घात केला.

\भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मिचेल स्टार्कने दमदार सुरुवात केली. त्याने टाकलेला पहिलाच चेंडू रोहितच्या बॅटला लागून यष्टीरक्षक अॅलेक्स केरीच्या हाती विसावला. जोरदार अपील झाले, परंतु अम्पायर नीतिन मेनन यांनी नाबाद दिले. DRS घेतला असता तर रोहित बाद ठरला असता. चौथ्या चेंडूवर रोहितसाठी LBW होता, पण याहीवेळेत ऑस्ट्रेलियाने DRS नाही घेतला. रोहित जलदगती गोलंदाजांना सहज खेळून काढतोय असे दिसत असताना स्मिथने फिरकीपटूंना गोलंदाजीला आणले आणि सहाव्या षटकात विकेट मिळाली. मॅथ्यू कुहनेमनच्या गोलंदाजीवर रोहित फटका मारण्यासाठी पुढे आला अन् केरीने त्याला यष्टीचित केले. रोहित १२ धावांवर बाद झाला. 

शुबमन गिल ( २१) याचीही विकेट पुढील षटकात कुहनेमननेच घेतली. चेतेश्वर पुजारा ( १) नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला अन् भारताने ८.२ षटकांत ३६ धावांत ३ फलंदाज गमावले.  लियॉनने ११व्या षटकात जडेजाला पायचीत केले होते, परंतु DRS मध्ये तो वाचला. पण, पुढच्याच चेंडूवर कुहनेमनने अफलातून झेल घेतला अन् जडेजा बाद झाला. भारताने ४४ धावांत ४ फलंदाज गमावले. श्रेयस अय्यरला आज मोठी खेळी करण्याची संधी होती, परंतु कुहनेमने टाकलेला चेंडू चांगलाच वळला अन् अय्यरच्या बॅटला लागून यष्टिंवर आदळला. अय्यर भोपळ्यावर माघारी परतला अन् भारताचा निम्मा संघ ४५ धावांत तंबूत गेला. विराट व भरत यांनी १० षटकं खेळून काढतान २५ धावांची भागीदारी केली, परंतु टॉड मर्फीनं ही जोडी तोडली. या मालिकेत विराटला दोन वेळा बाद करणाऱ्या मर्फीने तिसऱ्यांदाही कमाल करून दाखवली. विराट ५२ चेंडूंत २२ धावांवर LBW झाला. भारताने ७० धावांवत सहावा फलंदाज गमावला. लियॉनने त्यानंतर केएस भरतला ( १७) LBW केले आणि भारताने ८२ धावांवत सातवा फलंदाज गमावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरवींद्र जडेजा
Open in App