Join us  

Ind vs Aus 3rd test live : अश्विन 'अन्ना'ची धास्ती! मार्नस लाबुशेनने सुरू केला माईंड गेम, रोहित अन् अम्पायरने दिली समज, Video

India vs Australia 3rd test live score updates : तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 10:26 AM

Open in App

India vs Australia 3rd test live score updates : तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड घेतली आहे. नॅथन लाएनच्या ८ विकेट्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर गुंडाळला आणि त्यांना विजयासाठी ७६ धावा करायच्या आहेत. पण, हा धावा करणं एवढं सोपं नक्की नाही, याची कल्पनाही त्यांना आहेच. आर अश्विनने नव्या चेंडूसह दुसऱ्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाची विकेट घेऊन त्याची प्रचिती दिली. स्टेडियममधील प्रेक्षक भारतीय गोलंदाजांचा मनोबल वाढण्यासाठी करत असलेला जल्लोष पाहून ऑसी फलंदाज बॅकफूटवर गेले. यावर उतारा म्हणून मार्नस लाबुशेनने माईंड गेम सुरू केला आणि त्याला समजावण्यासाठी रोहित शर्मा व अम्पायरना यावे लागले. 

अर्जुन तेंडुलकरची मैत्रिण; विराटने ९ वर्षांपूर्वी जिचं मन दुखवलं, तिने काल समलैंगिक जोडीदारासोबत लग्न केलं

भारतीय संघाला पहिल्या डावात १०९ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात  ४ बाद १८६ वरून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर गडगडला. त्यांना ८८ धावांचीच आघाडी घेता आली. रवींद्र जडेजा ( ४-७८), आर अश्विन ( ३-४४) आणि उमेश यादव ( ३-१२) यांनी उल्लेखनीय गोलंदाजी केली. भारताची दुसऱ्या डावातही सुरुवात काही खास झाली नाही. शुभमन गिल ( ५), रोहित शर्मा (१२), विराट कोहली ( १३), रवींद्र जडेजा ( ७) हे अपयशी ठरले. चेतेश्वर पुजारा एका बाजूने विकेट टिकवून खेळत होता आणि श्रेयस अय्यर ( २६) चांगल्या फॉर्मात दिसला, परंतु  उस्मान ख्वाजाने डाईव्ह मारून त्याचा अप्रतिम झेल टीपला. 

स्टीव्ह स्मिथने डाव्या स्लीपमध्ये अफलातून झेल घेतला. पुजारा १४२ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५९ धावांवर माघारी परतला. भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर गडगडला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ७६ धावा करायच्या होत्या.  लाएनने २३.३-१-६४-८ अशी गोलंदाजी केली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक ११३ विकेट्सचा विक्रम लाएनने नावावर केला. त्याने अनिल कुंबळेचा १११ विकेट्सचा विक्रम मोडला. हे लक्ष्य सोपं नक्कीच नसेल याची कल्पना ऑस्ट्रेलियाला होती. त्यात आर अश्विनने नव्या चेंडू चांगलाच वळवला अन् दुसऱ्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद केले. अश्विनने टाकलेला चेंडू वळला अन् बॅटला घासून यष्टिरक्षक केएस भरतच्या हाती विसावला. 

कसोटीक क्रिकेटमध्ये सर्वात कमी ८५ धावांचा यशस्वी बचाव १४१ वर्षांपूर्वी झाला होता आणि आता टीम इंडियाला तो विक्रम मोडण्याची संधी आहे.  १०व्या षटकात मार्नस लाबुशेन व आर अश्विन यांच्यात माईंड गेम सुरू झाला. अश्विन गोलंदाजीला आला असताना लाबुशेन टाईमपास करू लागला आणि त्याने अश्विन वैतागला. अम्पायर व रोहित शर्मा त्याला समजावण्यासाठी आले. त्यानंतर अश्विननेही गोलंदाजीसाठी मोठा रन अप घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याची ही कृती पाहून प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआर अश्विन
Open in App