India vs aus 3rd test live scorecard Indore : भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीवर पकड घेण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या डावात १०९ धावा करणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर गुंडाळला. ४ बाद १८६ वरून ऑस्ट्रेलियाचा डाव पुढील ११ धावांत गडगडला. पण, या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीयांकडून अक्षम्य चुका झालेल्या पाहायला मिळाल्या. फलंदाजांनी शरणागती पत्करलीच शिवाय कर्णधार रोहित शर्माने तिन्ही DRS पहिल्याच दिवशी वाया घालवले. नशीबाने त्याचा फार मोठा फटका भारताला बसला नाही. पहिल्या दिवशी रोहितने फिरकीपटू रवींद्र जडेजाला शिवी घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
३४ चेंडू, ११ धावा, ६ विकेट्स! पाहा टीम इंडियाच्या अविश्वसनीय कमबॅकचा २.१६ मिनिटांचा Video
भारतीय संघाला पहिल्या डावात १०९ धावाच करता आल्या. मॅथ्यू कुहनेमन याने १६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. नॅथन लियॉनने तीन, तर टॉड मर्फीने १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात रवींद्र जडेजाने पहिल्या दिवशी ४ विकेट्स घेतल्या. पण, त्याने तीन DRS वायाही घालवले. तो प्रत्येक षटकात अपील करत होता आणि रोहितला DRS घेण्यास भाग पाडत होता. रोहितने ४ वेळा DRS घेतला आणि त्यापैकी ३ वाया गेले. त्यामुळेच आर अश्विनच्या गोलंदाजीवर मार्नस लाबुशेन बाद होता आणि रोहितने आधीच्या चुकांमुळे DRS घेतला नाही. नंतर रिप्लेत तो बाद असल्याचे दिसले. मार्नस व उस्मान ख्वाजा यांनी ९६ धावांची भागीदारी केली.
रवींद्र जडेजा वारंवार अपील करत होता आणि DRS साठी जाण्यास सांगत होता. दोन DRS वाया गेल्यानंतर रोहितने त्याला शिवी दिली आणि बॉल कुठे लागतोय ते बघ आधी अशी सूचना केली. हे सर्व गमतीने सुरू होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"