India vs Australia 3rd test live score updates : तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मिचेल स्टार्क व कॅमेरून ग्रीन हे दोन तगडे खेळाडू संघात परतल्याने त्यांची ताकद वाढली आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करतोय. स्टार्कच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा ( Rohit Sharma) दोन वेळा बाद होता, परंतु ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव जाणवला अन् रोहितला जीवदान मिळाले. पण, कर्णधार स्मिथच्या चतुराईने भारताचे तीन फलंदाज धडाधड माघारी परतले.
पहिल्याच षटकात रोहित शर्मा दोनवेळा बाद झाला अन्...; ऑस्ट्रेलियाला 'चूक' पडली महागात
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी येथे झालेल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांचेच पारडे जड राहिले आहे. अपेक्षित लोकेश राहुलला बाकावर बसवले गेले असून शुभमन गिलची एन्ट्री झाली आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली असून उमेश यादव आज खेळणार आहे. मिचेल स्टार्कने दमदार सुरुवात केली. त्याने टाकलेला पहिलाच चेंडू रोहितच्या बॅटला लागून यष्टीरक्षक अॅलेक्स केरीच्या हाती विसावला. जोरदार अपील झाले, परंतु अम्पायर नीतिन मेनन यांनी नाबाद दिले. DRS घेण्याची संधी कर्णधार स्मिथकडे होती, परंतु यष्टिरक्षक व गोलंदाज यांना गॅरंटी नसल्याने त्याने DRS घेतला नाही. पण, त्यानंतर रिप्लेमध्ये चेंडू व बॅट यांच्यात संपर्क झाल्याचे स्पष्ट दिसले अन् ऑस्ट्रेलियाच्या मॅनेजमेंटने डोक्यावर हात मारला.
चौथ्या चेंडूवर रोहितसाठी LBW ची अपील झाली. स्टार्कचा चेंडू भन्नाट वेगाने रोहितच्या बॅटला चकवून पॅडवर आदळला. पण, तो आधी बॅटला आदळला असेल असा अंदाज घेत ऑस्ट्रेलियाने DRS नाही घेतला. यातही रिप्लेमध्ये रोहित बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते. पहिल्या षटकात दोन वेळा बाद असूनही रोहितला कांगारूंच्या चुकीमुळे जीवदान मिळाले. रोहित जलदगती गोलंदाजांना सहज खेळून काढतोय असे दिसत असताना स्मिथने फिरकीपटूंना गोलंदाजीला आणले आणि सहाव्या षटकात विकेट मिळाली. मॅथ्यू कुहनेमनच्या गोलंदाजीवर रोहित फटका मारण्यासाठी पुढे आला अन् केरीने त्याला यष्टीचित केले. रोहित १२ धावांवर बाद झाला.
त्यानंतर शुबमन गिल ( २१) याचीही विकेट पुढील षटकात कुहनेमननेच घेतली. चेतेश्वर पुजारा ( १) नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला अन् भारताने ८.२ षटकांत ३६ धावांत ३ फलंदाज गमावले. लियॉनने ११व्या षटकात जडेजाला पायचीत केले होते, परंतु DRS मध्ये तो वाचला. पण, पुढच्याच चेंडूवर कुहनेमनने अफलातून झेल घेतला अन् जडेजा बाद झाला. भारताने ४४ धावांत ४ फलंदाज गमावले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"