India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या कसोटीत भारताला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. DRS न घेण्याचा चुका त्यांच्याकडून झाल्या, परंतु वेळीच स्मिथने योग्य डावपेच टाकले आणि भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. मागील १५ वर्षांतील ही भारताची चौथी निचांक खेळी ठरली. पण, ऑसींप्रमाणे भारतीयांचेही काही निर्णय चुकले आणि त्यात आर अश्विनच्या बाबातित अन्याय घडला.
रवींद्र जडेजाने विकेट मिळवली, परंतु चुकीने एक विकेट गमावलीही; रवी शास्त्री, सुनील गावस्कर संतापले
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा दोन वेळा बाद होता, परंतु DRS न घेतल्याने तो मैदानावार टीकला. तरीही रोहित १२ धावांवर बाद झाला. शुबमन गिल ( २१), चेतेश्वर पुजारा ( १) व श्रेयस अय्यर ( ०) हेही माघारी परतले. विराट कोहली व केएस भरत यांनी २५ धावांची भागीदारी केली. विराट ५२ चेंडूंत २२ धावांवर LBW झाला. बघता बघता भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गडगडला. विराटने सर्वाधिक २२, गिलने २१ आणि केएस भरतने १७ धावा केल्या. मॅथ्यू कुहनेमन याने १६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. नॅथन लियॉनने तीन, तर टॉड मर्फीने १ विकेट घेतली.
ट्रॅव्हीस हेड व उस्मान ख्वाज यांनी सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु रवींद्र जडेजाने धक्का दिला. सहाव्या षटकात जडेजाने ऑसी सलामीवीराला ( ९) पायचीत केले. त्याच षटकात जडेजाने मार्नस लाबुशेनची विकेट मिळवली होती. लाबुशेनचा फटका चुकला अन् चेंडू बॅटला लागून यष्टींवर आदळला. लाबूशेन बाहेर जात असताना अम्पायरने नो बॉलचा इशारा दिला. त्या षटकातील जडेजाचा हा दुसरा नो बॉल होता.
रवींद्र जडेजासाठी कर्णधार रोहितने दोन वेळा DRS घेतला परंतु दोन्ही DRS वाया गेले. पण, जेव्हा अश्विनच्या गोलंदाजीवर मार्नस लाबुशेनसाठी DRS घेण्याची गरज होती तेव्हा रोहितने टाळले. नेमके त्याचवेळी रिप्लेत लाबुशेन वाद असल्याचा दिसला अन् रोहित खुदकन हसला. पहिले दोन DRS वाया गेल्याने रोहितने इथे DRS घेण्याचं धाडस दाखवलं नाही, परंतु तसे केले असते तर विकेट मिळाली असती. ऑस्ट्रेलियाने २१ षटकांत १ बाद ७० धावा केल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"