Join us  

Ind vs Aus 3rd test live : उस्मान ख्वाजाचा अफलातून झेल अन् भारतीय संघाच्या अडचणीत वाढ; ६ फलंदाज माघारी, Video 

India vs Australia 3rd test live score updates : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करून दाखवली. भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्याची संधी होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 3:24 PM

Open in App

India vs Australia 3rd test live score updates : तिसरी कसोटी रंजक वळणावर आली आहे. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करून दाखवताना ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. पण, फलंदाजांनी पुन्हा निराश केले. चेतेश्वर पुजारा एकटा खिंड लढवतोय.

WTC Final Qualification Scenario : इंदूर कसोटीत हरल्यास, भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये कसा पोहोचेल? गणित जे चक्रावून टाकेल

भारतीय संघाला पहिल्या डावात १०९ धावाच करता आल्या. मॅथ्यू कुहनेमन याने १६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. नॅथन लियॉनने तीन, तर टॉड मर्फीने १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात ट्रॅव्हीस हेड ( ९) लगेच माघारी परतला. उस्मान ख्वाज ( ६०) आणि मार्नस लाबुसेन ( ३१) यांनी ९६ धावांची भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथ ३८ चेंडूंत २६ धावा करून माघारी परतला. पीटर हँड्सकोम्ब ( १९) व कॅमेरून ग्रीन (२१) हे दुसऱ्या दिवशी खिंड लढवत होते. त्यांनी पहिल्या सत्रातील ड्रींक्स ब्रेकपर्यंत ३० धावा जोडल्या. पण, त्यानंतर रोहितने गोलंदाजीला आर अश्विनला आणले आणि फिरकीपटूने कमाल केली.  ४ बाद १८६ वरून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर गडगडला. त्यांनी ८८ धावांचीच आघाडी घेतली.India vs Australia test series 

भारताची दुसऱ्या डावातही सुरुवात काही खास झाली नाही. पाचव्या षटकात शुभमन गिल ( ५) लियॉनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर लियॉनने १५व्या षटकात रोहितला (१२) पायचीत केले. चेतेश्वर पुजारा एका बाजूने चांगला खेळ करताना दिसला. विराट कोहली त्याला साथ देईल असे आशादयक चित्र दिसत असताना किंग कोहली चुकीचा फटका मारायला गेला. मॅथ्यू कुहनेमनने त्याला (१३) पायचीत केले. लियॉनने तिसरा धक्का देताना रवींद्र जडेजाला ( ७) पायचीत केले. पुजारा एका बाजूने विकेट टिकवून खेळत होता आणि श्रेयस अय्यर आज चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने ३ चौकार व २ खणखणीत षटकार खेचून २७ चेंडूंत २६ धावा केल्या. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजावीर त्याने टोलावलेला चेंडू उस्मान ख्वाजाने डाईव्ह मारून टीपला. त्यानंतर लियॉनने भारताला आणखी एक धक्का देताना केएस भरतचा त्रिफळा उडवला. भारताने ११८ धावांवर सहावा फलंदाज गमावला अन् केवळ ३० धावांची आघाडी घेतलीय.Ind vs aus scorecard 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचेतेश्वर पुजाराश्रेयस अय्यर
Open in App