Ind vs Aus 4th test live: भारत संकटात असताना शुबमन गिल 'खंबीर' राहिला, शतक झळकावत इतिहास रचला 

रोहित बाद झाल्यानंतर शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह भारताचा डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 02:14 PM2023-03-11T14:14:24+5:302023-03-11T14:20:33+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 4th test live scorecard Ahmedabad -2nd Test hundred for Shubman Gill, Shubman Gill becomes the 4th Indian to score a century in all the 3 formats for India in the same calendar year. | Ind vs Aus 4th test live: भारत संकटात असताना शुबमन गिल 'खंबीर' राहिला, शतक झळकावत इतिहास रचला 

Ind vs Aus 4th test live: भारत संकटात असताना शुबमन गिल 'खंबीर' राहिला, शतक झळकावत इतिहास रचला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 India vs Australia 4th test live score updates : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारतानेही चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहित बाद झाल्यानंतर शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह भारताचा डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. शुबमनने कसोटीतील दुसरे शतक पूर्ण करताना भारताला मजबूत स्थितीत आणले. कॅलेंडर वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो चौथा भारतीय ठरला. त्याने २०२३ मध्ये वन डेत द्विशतक, ट्वेंटी-२०त शतक आणि आज कसोटीत शतक झळकावले. यापूर्वी कॅलेंडर वर्षात रोहित शर्मा, सुरेश रैना व लोकेश राहुल यांनी हा पराक्रम केला होता.

 


रोहित व शुबमन जोडी चांगली फटकेबाजी करताना दिसतेय. १८व्या षटकात नॅथन लाएनच्या गोलंदाजीवर गिलने पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आधी पॅडवर आदळला. त्यामुळे अपील झाले अन् ऑसींनी DRS घेतला. चेंडू प्रथम पॅडला लागल्याचे दिसले आणि इम्पॅक्टमध्ये चेंडू स्टम्प्सवर आदळताना दिसला, पण इम्पॅक्ट क्रिजपासून ३ मीटर लांब असल्याने तो नाबाद राहिला. रोहितने आजच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ हजार धावांचा टप्पा ओलांडला. असा पराक्रम करणारा रोहित सहावा भारतीय ठरला. रोहित ( ३५)  माघारी परतला. India vs Australia test series 

रोहित व गिल यांची ७४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बॅकफूटवर जाऊन खणखणीत चौकार खेचून शुबमन गिलने अर्धशतक पूर्ण केले. शुबमन व चेतेश्वर पुजारा यांनी भारतासाठी खिंड लढवली आहे. पण, स्टीव्ह स्मिथच्या चतुर क्षेत्ररक्षणात त्यांना धाव शोधताना संघर्ष करायला लावले. १२-१३ षटकं भारताच्या या जोडीला एकही चौकार खेचता आला नाही आणि दीडच्या सरासरीनेच धावा करता आल्या. स्मिथची फिल्ड प्लेसमेंट भारताच्या धावांवर अंकुश ठेवून होती.

अखेर ९६ चेंडूंनंतर शुबमनने भारताला चौकार मिळवून दिली. त्याने कॅमेरून ग्रीनला दोन खणखणीत चौकार खेचले. त्यानंतर शुबमनने त्याचे शतकही पूर्ण केले. त्याने १९४ चेंडूंत कसोटीतील दुसरे शतक पूर्ण केले, अहमदाबाद येथे शतक झळकावणारा तो भारताचा पाचवा सलामीवीर ठरला. ऑस्ट्रेलियाच्या ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत २ बाद १८८ धावा केल्या आहेत.


सदगोपन रमेश ( ११० वि. न्यूझीलंड, १९९९)
गौतम गंभीर ( ११४ वि. श्रीलंका, २००९)
वीरेंद्र सेहवाग ( १७३ वि. न्यूझीलंड, २०१०)
वीरेंद्र सेहवाग ( ११७ वि. इंग्लंड, २०१२)  


सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs aus 4th test live scorecard Ahmedabad -2nd Test hundred for Shubman Gill, Shubman Gill becomes the 4th Indian to score a century in all the 3 formats for India in the same calendar year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.