India vs Australia 4th test live score updates : विराट कोहलीने २०१९नंतर पहिले कसोटी शतक झळकावले. अहमदाबादच्या चौथ्या कसोटीत विराटने चौथा दिवस नावावर करताना कसोटीतील २८वे शतक पूर्ण केले. रवींद्र जडेजानंतर विराटने यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरतसह ५०+ धावांची भागीदारी करून भारताला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून दिली. India vs Australia test series
रवींद्र जडेजाने विकेट फेकली, विराट कोहलीची सटकली! समालोचकांनीही टीका केली, Video
शुबमन गिलच्या ( Shubman Gill Century) शतकाने भारताला चौथ्या कसोटीत चांगल्या स्थितीत आणले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारताकडूनही सडेतोड उत्तर मिळाले आहे. रोहित शर्मा ( ३५) बाद झाल्यानंतर शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. शुबमन २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२८ धावांवर बाद झाला. नॅथन लाएनने त्याला LBW केले. विराट कोहलीने त्यानंतर मोर्चा सांभाळताना अर्धशतक पूर्ण केले.दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ३ बाद २८९ धावा केल्या होत्या. Ind vs aus scorecard
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या काही षटकांनंतर रवींद्र जडेजाने विकेट फेकली... विराट कोहलीसोबत चांगली भागीदारी सुरू असताना त्याने उस्मान ख्वाजाच्या हातात सोपा झेल दिला. जडेजा ८४ चेंडूंत २८ धावांवर माघारी परतला. कोहलीसोबत त्याने ६४ धावा जोडल्या होत्या. टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर जड्डूने चुकीचा फटका मारला. यापूर्वी असाच फटका मारला होता अन् त्यावर तो वाचला होता. पण, त्याने ती चूक पुन्हा केली अन् विकेट गमावली. विराट व केएस भारत यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. कॅमेरून ग्रीनच्या एका षटकात भरतने दोन षटकार व एक चौकारासह १९ धावा चोपल्या. या कसोटीतील हे सर्वात महागडे षटक ठरले. नॅथन लाएनने ही विकेट मिळवून दिली. भरत ८८ चेंडूंत ४४ धावांवर ( २ चौकार व ३ षटकार) माघारी परतला आणि विराटसह त्याची ८४ धावांची भागीदारी संपुष्टात आली.Ind vs aus 4th test match live score
दरम्यान, २२ नोव्हेंबर २०१९ नंतर विराट कोहलीने कसोटीत शतक पूर्ण केले. कसोटीतील हे त्याचे २८ वे शतक ठरले. त्याने शतकानंतर गळ्यातील लॉकेट काढले अन् त्याला किस करत सेलिब्रेशन केले. त्याचे हे ७५ वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे हे ८वे कसोटी शतक ठले आणि त्याने सुनील गावस्करांच्या विक्रमाशी ( ८) बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ११ शतकं झळकावली आहेत.