Join us  

Ind vs Aus 4th test live: 'आजारी' असूनही विराट कोहलीने ३६४ चेंडूंत १८६ धावा केल्या; अनुष्का शर्माच्या पोस्टची चर्चा

India vs Australia 4th test live score updates : विराट कोहलीने ( Virat Kohli) आज पुन्हा एकदा त्याला 'किंग कोहली' का म्हणतात, हे सिद्ध करून दाखवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 5:06 PM

Open in App

India vs Australia 4th test live score updates : विराट कोहलीने ( Virat Kohli) आज पुन्हा एकदा त्याला 'किंग कोहली' का म्हणतात, हे सिद्ध करून दाखवले. २०१९नंतर विराटने कसोटी क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ संपवताना अनेक विक्रमांचा पाऊस पाडला. विराटने अक्षर पटेलसह ( Axar Patel) सहाव्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. त्याने तळाच्या फलंदाजांना भारताला आघाडी मिळवून दिली. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मैदानावर उतरू न शकल्याने विराटला द्विशतकापासून वंचित रहावे लागले.  विराट ३६४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावांवर झेलबाद झाला. भारताने ९ बाद ५७१ धावा करताना ९१ धावांची आघाडी घेतली. विराटच्या या अविश्वसनीय खेळीनंतर अनुष्का शर्माने ( Anushka Sharma) पोस्ट लिहिली आणि त्यातून तो 'आजारी' असल्याचे जगासमोर आले. 

 

Ind vs Aus 4th test live: विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारताच्या ७ फलंदाजांनी घडविला इतिहास

रोहित शर्मा ( ३५) बाद झाल्यानंतर शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह ( ४२) दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. शुबमन २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२८ धावांवर बाद झाला. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या काही षटकांनंतर रवींद्र जडेजाने ( २८) विकेट फेकली. कोहलीसोबत त्याने ६४ धावा जोडल्या होत्या. विराट व केएस भारत ( ४४) यांनी ८४ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज दमले होते आणि भारतीय फलंदाज त्यांना अधिक त्रास देताना दिसले. विराट व अक्षर यांनी सहाव्या विकेटसाठी २१५ चेंडूंत १६२ धावांची भागीदारी केली. अक्षर ११३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७९ धावांवर मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. India vs Australia test series 

त्यानंतर आलेला आर अश्विनही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर झेलबाद झाला. उमेश यादवही शून्यावर रन आऊट झाला. विराटच्या सोबतीला मोहम्मद शमी होता. १८५ धावांवर विराट कोहलीचा पीटर हँड्सकोम्बने झेल सोडला. स्टीव्ह स्मिथने सर्व खेळाडू ३० यार्ड सर्कलच्या बाहेर उभे करून विराटला चौकार मारण्यापासून रोखले. त्यामुळे विराटला हवेत फटके मारावे लागले आणि त्या प्रयत्नात तो बाद झाला. विराटच्या या खेळीनंतर अनुष्काने इस्टाग्राम स्टोरी लिहिली, आजारपण असूनही तू शांत राहून ही अविस्मरणीय खेळी केलीस. हे मला नेहमी प्रेरणा देत राहिल. Ind vs aus 4th test match live score

ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद ३ धावा केल्या आणि अजूनही ते ८८ धावांनी पिछाडीवर आहेत. केेएस भरत आणि चेतेश्वर पुजारा यांच्याकडून दोन झेल सुटले अन्यथा ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट झाली असती. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअनुष्का शर्माविराट कोहली
Open in App