India vs Australia 4th test live score updates : उस्मान ख्वाजा ( Usman Khawaja) ने १० तासांहून अधिक काळ भारतीय गोलंदाजांना दमवले.. विक्रमी ४२२ चेंडूंचा सामना करताना त्याने १८० धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्याने स्टीव्ह स्मिथसह आधी ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर कॅमेरून ग्रीनसह पाचव्या विकेटसाठी २०८ धावांची विक्रमी भागीदारी केली. टॉड मर्फी व नॅथन लाएन या जोडीने ९व्या विकेटसाठी ७० धावा जोडताना भारताची डोकेदुखी आणखी वाढवली. आर अश्विनने ६ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला.
ट्रॅव्हीस हेड ( ३२), मार्नस लाबुशेन ( ३), स्टीव्ह स्मथि ( ३८), पीटर हँड्सकोम्ब ( १७) हे मोठी खेळी करू शकले नाही. दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. ग्रीनने १७० चेंडूंत १८ चौकारांच्या मदतीने ११४ धावा केल्या. अश्विनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. ग्रीन व ख्वाजा यांची २०८ धावांची भागीदारी विक्रमी ठरली. भारतातील ऑस्ट्रेलियाची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अश्विनने त्याच षटकात अॅलेक्स केरीला ( ०) माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाला दोन झटके दिले. अश्विनने तिसरा धक्का देताना मिचेल स्टार्कला ( ६) बाद केले.India vs Australia test series
अक्षर पटेलने भारताला ख्वाजाची विकेट मिळवून दिली. LBW साठी जोरदार अपील झाले आणि कर्णधार रोहितच्या गैरहजेरीत चेतेश्वर पुजारा कर्णधाराची भूमिका बजावत होता आणि त्याने DRS घेतला. त्यावर ख्वाजा बाद असल्याचे निर्णय आला अन् पुजारा खूप आनंदी झाला. ख्वाजा ४२२ चेंडूंत २१ चौकारांच्या मदतीने १८० धावा करून माघारी परतला. ४०९ धावांवर ही विकेट मिळवली, परंतु त्यानंतरही ऑसींच्या शेपटाने भारताला रडवले. नॅथन लाएन व टॉड मर्फी या जोडीने ११७ चेंडूंत ७० धावा जोडल्या. मर्फी ६१ चेंडूंत ५ चौकारांसह ४१ धावांवर अश्विनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अश्विनने कसोटी क्रिकेटच्या एका डावातील ३२वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताकडून सर्वाधिक ११२ विकेट्स घेण्याचा पराक्रम अश्विनने नावावर केला. त्याने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला. अश्विनने शेवटची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४८० धावांत गुंडाळला. अश्विनने ९१ धावांत ६ विकेट्स घेतल्या. Ind vs aus 4th test match live score
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs aus 4th test live scorecard Ahmedabad - Australia bowled out for 480, Ravi Ashwin picks a six wicket haul
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.