Join us  

Ind vs Aus 4th test live: अक्षर पटेलने 'चेंडू' असा वळवला की ऑसी फलंदाजाचे हुकले शतक; भारतीय गोलंदाजाने नोंदवला विक्रम, Video 

India vs Australia 4th test live score updates : ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवताना ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 2:28 PM

Open in App

India vs Australia 4th test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित होण्याच्या मार्गावर आहे. पण, आता या निकालाला फार अर्थ राहणार नाही, कारण भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( WTC Final) स्थान पक्के केले आहे. ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवताना ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर अक्षर पटेलने ( Axar Patel) चेंडू असा वळवला की ऑसी फलंदाजाचे शतक हुकले. अक्षरने ही विकेट घेत पराक्रम केला.  

मै होता तो जरूर Out होता! विराट कोहलीने Live मॅचमध्ये अम्पायर नितीन मेनन यांना सुनावलं

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात विराटने अक्षर पटेलसह ( Axar Patel) सहाव्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. विराट ३६४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावांवर झेलबाद झाला. भारताने ९ बाद ५७१ धावा करताना ९१ धावांची आघाडी घेतली. तत्पूर्वी,  रोहित शर्मा ( ३५), चेतेश्वर पुजारा ( ४२), रवींद्र जडेजा ( २८), केएस भरत ( ४४) यांनी चांगली खेळी केली. शुबमन २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२८ धावांवर बाद झाला. भारताच्या पहिल्या सहा विकेट्सने प्रत्येकी ५०+ धावांची भागीदारी केली. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताच्या पहिल्या सहा फलंदाजांनी ५०+ धावांची भागीदारी केली.    पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला आर अश्विनने पहिली विकेट मिळवून दिली. नाईट वॉचमन म्हणून आलेला मॅथ्यू कुहुनेमन ६ धावांवर LBW झाला. त्याने DRS घेतला असता तर तो वाचला असता. ऑस्ट्रेलियाला १४ धावांवर पहिला धक्का बसला. ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २९२ चेंडूंत १३९ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने ही जोडी तोडली. त्याने टाकलेल्या अप्रतिम चेंडूवर ट्रॅव्हिसचा त्रिफळा उडाला. ट्रॅव्हिस १६३ चेंडूंत ९० धावांवर बाद झाला. अक्षरची ही ५० वी विकेट ठरली आणि भारताकडून सर्वात कमी चेंडूंत त्याने हा टप्पा ओलांडला. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअक्षर पटेल
Open in App