India vs Australia 4th test live score updates : विराट कोहलीने १२०४ दिवसांनी आपले २८ वे कसोटी शतक पूर्ण केले. चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी विराटने शतकांचा दुष्काळ संपवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत विराटने पहिल्यांदा ५०+ धावा केल्या. कोहलीच्या १८६ धावांच्या विक्रमी खेळीने टीम इंडियाला पहिल्या डावात मजबूत स्थितीत आणले आहे. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात कोहली फलंदाजीसाठी क्रिजवर पोहोचला आणि चौथ्या दिवशी त्याने संपूर्ण वेळ क्रीजवर घालवून हा पराक्रम केला. त्याने ३६४ चेंडूंचा सामना केला आणि त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ८वी सर्वोच्च धावसंख्या ठरली.
...तरीही ८ तास ४० मिनिटे 'देशासाठी' मैदानावर लढला; विराट कोहलीला नेमकं काय झालेलं याचा खुलासा झाला
विराटच्या या शानदार खेळीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. माजी क्रिकेटपटूंपासून ते इतर देशांतील क्रिकेटपटूही विराटच्या खेळीचे कौतुक करत आहेत. या सगळ्या दरम्यान त्याची पत्नी अनुष्का शर्माने इन्स्टा स्टोरीमध्ये त्याच्यासाठी एक खास संदेश लिहिला आणि सांगितले की, विराट आजारी असतानाही इतकी शानदार खेळी खेळला. अनुष्का म्हणाली की, अशा आजारात खेळणे मला नेहमीच प्रेरणा देते.
पण या सगळ्यात विराटचा साथीदार आणि त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ क्रिझवर घालवणारा फलंदाज अक्षर पटेलने याबाबत मोठा खुलासा केला आहे. अक्षर पटेल म्हणाला की, ''विराट कोहली आजारी आहे, असे मला वाटत नाही. अक्षरने विराटचे कौतुक करत तो ज्या पद्धतीने विकेट्सच्या दरम्यान धावत होता ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्याच्यासोबत फलंदाजी करताना मजा आली. त्याचवेळी अक्षर पुढे म्हणाला की, विराट आजारी दिसत नाहीये. अशा उन्हात त्याने अप्रतिम खेळी खेळली. त्याच्यासोबत ही चांगली भागीदारी होती आणि तो खूप चांगला धावला. अक्षर पटेलने ७९ धावा करताना विराटसोबत सहाव्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"