India vs Australia 4th test live score updates : उस्मान ख्वाजा ( Usman Khawaja) ने १० तासांहून अधिक काळ भारतीय गोलंदाजांना दमवले... विक्रमी ४२२ चेंडूंचा सामना करताना त्याने १८० धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्याने आधी स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला आणि त्यानंतर कॅमेरून ग्रीनसह पाचव्या विकेटसाठी ३५८ चेंडूंचा सामना करताना २०८ धावांची विक्रमी भागीदारी केली. अक्षर पटेलला ( Axar Patel) ही विकेट मिळवण्यात यश आलं आणि त्यात स्टँडबाय कर्णधार चेतेश्वर पुजाराचा ( Cheteshwar Pujara) DRS घेण्याचा निर्णय मास्टर स्ट्रोक ठरला. India vs Australia test series
आर अश्विनचे तीन झटके, अनिल कुंबळेच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी; उस्मान ख्वाजाने रचला इतिहास
ट्रॅव्हीस हेड ( ३२), मार्नस लाबुशेन ( ३) हे माघारी परतल्यानंतर ख्वाजा व स्टीव्ह स्मिथ यांनी ७९ धावांची भागिदारी केली. स्मिथ १३५ चेंडूंत ३८ धावांवर माघारी परतला. पीटर हँड्सकोम्ब ( १७) त्रिफळाचीत झाला. कॅमेरून ग्रीन १७० चेंडूंत १८ चौकारांच्या मदतीने ११४ धावांवर अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ग्रीन व ख्वाजा यांची २०८ धावांची भागीदारी विक्रमी ठरली. भारतातील ऑस्ट्रेलियाची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अश्विनने त्याच षटकात अॅलेक्स केरीला ( ०) माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाला दोन झटके दिले. अश्विनने तिसरा धक्का देताना मिचेल स्टार्कला ( ६) बाद केले.Ind vs aus scorecard
ख्वाजा मात्र खिंड लढवत होता आणि त्याने ४००+ चेंडूंचा सामना करताना इतिहास घडविला. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला भारतात असा पराक्रम करता आलेला नाही. यापूर्वी १९७९मध्ये ग्रॅहम यालोप यांनी ३९२ चेंडूंचा सामना केला होता. शिवाय त्याने यालोप यांचा १६७ धावांचा विक्रमही मोडला. अक्षर पटेलने भारताला ही विकेट मिळवून दिली. LBW साठी जोरदार अपील झाले आणि कर्णधार रोहितच्या गैरहजेरीत चेतेश्वर पुजारा कर्णधाराची भूमिका बजावत होता आणि त्याने DRS घेतला. त्यावर ख्वाजा बाद असल्याचे निर्णय आला अन् पुजारा खूप आनंदी झाला. ख्वाजा ४२२ चेंडूंत २१ चौकारांच्या मदतीने १८० धावा करून माघारी परतला. ऑस्ट्रेलियाच्या ८ बाद ४२२ धावा झाल्या आहेत. Ind vs aus 4th test match live score
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"