India vs Australia 4th test live score updates : ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस नावावर ठेवला. सलामीवीर उस्मान ख्वाजा ( Usman Khwaja) भारतीय गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला आहे. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवून दिली. मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) दोन भन्नाट चेंडूंवर ऑसी फलंदाजांचे त्रिफळे उडवले. मार्नस लाबुशेन व पीटर हँड्सकोम्ब यांना भारतीय गोलंदाजाने त्रिफळाचीत केले. कर्णधार स्टीव्ह स्मिथने अनुभवी खेळी केली आणि कॅमेरून ग्रीनने वन डे स्टाईल फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाची पहिल्या दिवसावरील पकड अधिक मजबूत केली. India vs Australia test series
दोन भन्नाट चेंडू, ऑसी फलंदाजांचे उडाले 'दांडू'! मोहम्मद शमीने भारताला मिळवून दिल्या विकेट्स, Video
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सहाव्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिस हेडचा ( ७ धावांवर होता ) सोपा झेल यष्टिरक्षक केएस भरतने टाकला. टॅव्हीस हेड व ख्वाजा यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु आर अश्विनने हेडला ( ३२) माघारी पाठवले. मोहम्मद शमीने मार्नस लाबुशेनचा ( ३) त्रिफळा उडवला. उस्मान ख्वाजा चांगल्या फॉर्मात दिसला आणि त्याला कर्णधार स्टीव्ह स्मिथची साथ मिळाली. खेळपट्टी गोलंदाजांना फार मदत करताना दिसत नव्हती, त्यामुळे भारतीय गोलंदाजांना लाईन लेन्थवरच लक्ष ठेवून फलंदाजाकडून चूक व्हायची अपेक्षा ठेवावी लागत होती. Ind vs aus scorecard
स्मिथ व ख्वाज यांनीही संयमी खेळ सुरू ठेवला. ख्वाजा व स्मिथ यांची २४८ चेंडूंतील ७९ धावांची भागिदारी रवींद्र जडेजाने तोडली. जडेजाच्या चेंडूवर हलक्या हाताने फटका मारण्याचा प्रयत्न फसला. स्मिथच्या बॅट अन् पॅडला चेंडू घासून यष्टिंवर आदळला. स्मिथने रागात बॅट मैदानावर आपटली. तो १३५ चेंडूंत ३८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मोहम्मद शमीने डावातील दुसरी विकेट घेताना पीटर हँड्सकोम्बाला ( १७) त्रिफळाचीत केले. ऑस्ट्रेलियाने १७० धावांवर चौथी विकेट गमावली. Ind vs aus live match
कॅमेरून ग्रीन व ख्वाजा यांनी झटपट धावा जोडताना ८० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. दिवसाचा खेळ संपायला ९ षटकं बाकी असताना रोहितने नवा चेंडू मागवला. पण, शमीच्या एका षटकात ग्रीनने दोन खणखणीत चौकार खेचले. ख्वाजा शतकाच्या उंबरठ्यावर असतानाही संयमानेच खेळत होता, तर ग्रीन चांगले फटके खेचत होता. नव्या चेंडूनंतर विकेट मिळतील असे वाटले होते, परंतु कांगारूंनी ६च्या सरासरीने धावा चोपल्या. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या षटकात ख्वाजाने त्याचे शतक पूर्ण केले. भारताविरुद्धचे हे त्याचे पहिले शतक ठरले, तर एकंदर १४ वे कसोटी शतक झळकावले. ख्वाजा १०४ धावांवर, तर हँड्सकोम्ब ४९ धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ४ बाद २५५ धावा झाल्या आहेत. Ind vs aus 4th test match live score