Join us  

Ind vs Aus 4th test live: रवींद्र जडेजाने विकेट फेकली! श्रेयस अय्यरला हॉस्पिटलची वाट धरावी लागली; अहमदाबादमध्ये मोठी घडामोड

India vs Australia 4th test live score updates : ऑस्ट्रेलियाच्या ४८० धावांच्या प्रत्युत्तरात आज भारतीय संघ धावांचा डोंगर उभा करेल असे चित्र होते, परंतु

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 10:12 AM

Open in App

India vs Australia 4th test live score updates : विराट कोहली आणि रवींद्र जडेजा ही जोडी चांगली जमली होती... ऑस्ट्रेलियाच्या ४८० धावांच्या प्रत्युत्तरात आज भारतीय संघ धावांचा डोंगर उभा करेल असे चित्र होते, परंतु टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर जड्डूने चुकीचा फटका मारला. यापूर्वी असाच फटका मारला होता अन् त्यावर तो वाचला होता. पण, त्याने ती चूक पुन्हा केली अन् विकेट गमावली. जडेजाच्या विकेटनंतर श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) फलंदाजीला येणे अपेक्षित होते, परंतु केएस भरत मैदानावर आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर अय्यरबाबत मोठी अपडेट्स समोर आले. India vs Australia test series 

शुबमन गिलच्या ( Shubman Gill Century) शतकाने भारताला चौथ्या कसोटीत चांगल्या स्थितीत आणले आणि त्यात विराट कोहलीच्या अर्धशतकाने भर घातली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारताकडूनही सडेतोड उत्तर मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारतानेही चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा ( ३५) बाद झाल्यानंतर  शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. शुबमन २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२८ धावांवर बाद झाला. नॅथन लाएनने त्याला LBW केले. Ind vs aus scorecard 

विराट कोहलीने त्यानंतर मोर्चा सांभाळताना अर्धशतक पूर्ण केले. २ वर्ष, ३ आठवडे, ४ दिवस अन् १२ इनिंग्जनंतर विराटने घरच्या मैदानावर अर्धशतक झळकावले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसरे स्थान पटकावताना वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याला मागे टाकले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ३ बाद २८९ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या काही षटकांनंतर रवींद्र जडेजाने विकेट फेकली... विराट कोहलीसोबत चांगली भागीदारी सुरू असताना त्याने उस्मान ख्वाजाच्या हातात सोपा झेल दिला. जडेजा ८४ चेंडूंत २८ धावांवर माघारी परतला. कोहलीसोबत त्याने ६४ धावा जोडल्या होत्या. Ind vs aus 4th test match live score

अहमदाबाद कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अय्यरने कंबरेत दुखत असल्याचे कळवले आणि त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याने तो फलंदाजीला आला नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे. भारतासाठी हा मोठा धक्का आहे. Ind vs aus live  match

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजाश्रेयस अय्यर
Open in App