Join us  

Ind vs Aus 4th test live : नजर हटी, दुर्घटना...! स्टीव्ह स्मिथचा पायावर धोंडा, रवींद्र जडेजाने मिळवून दिली IMP विकेट, Video

India vs Australia 4th test live score updates : अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या तासाभरात चांगला खेळ केला. पण, ड्रिंक्सब्रेकनंतर आर अश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 3:22 PM

Open in App

India vs Australia 4th test live score updates : अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या तासाभरात चांगला खेळ केला. पण, ड्रिंक्सब्रेकनंतर आर अश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले. रोहित शर्माची इथे चतुर नेतृत्व पाहायला मिळाले. त्यांनी दोन्ही वेळेस गोलंदाजीत बदल केले आणि भारताला विकेट मिळाल्या. पहिल्या दिवसाच्या चौथ्या सत्रात रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांनी भारताला विकेट मिळवून दिल्या. ऑस्ट्रेलियाचे ४ फलंदाज १७० धावांवर माघारी परतले आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथची विकेट महत्त्वाची ठरली. India vs Australia test series 

क्रिकेट मॅच की पॉलिटिकल रॅली? खेळाडूंना वॉर्म अपसाठी मैदानाबाहेर पाठवले, पण ३००० पोलिसांच्या बंदोबस्तात कुत्र्याने सर्वांना चकवले

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सहाव्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिस हेडचा ( ७ धावांवर होता ) सोपा झेल यष्टिरक्षक केएस भरतने टाकला. ड्रिंक्स ब्रेकनंतर अश्विनने अखेर भारताला पहिले यश मिळवून दिले. हेडने मारलेला चेंडू जडेजाने अचूक टिपला. हेड ४४ चेंडूंत ७ चौकारांसह ३२ धावांवर बाद झाला. ६१ धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली. उस्मान ख्वाजा व मार्नस लाबुशेन ही जोडी आता डोकेदुखी वाढवणार असे दिसत असातना रोहितने गोलंदाजीत पुन्हा बदल केला. मोहम्मद शमीला त्याने पुन्हा गोलंदाजीला आणले अन् त्याने लाबुशेनचा ( ३) त्रिफळा उडवला. शमीने चेंडू चौथ्या विकेटवर फेकला होता, परंतु तो बॅटला लागून स्टम्पवर आदळला. लाबुशेन स्वतःच्या विकेटवर नाराज दिसला. ( भारत- ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीचे पूर्ण धावफलक) उस्मान ख्वाजा चांगल्या फॉर्मात दिसला आणि त्याला कर्णधार स्टीव्ह स्मिथची साथ मिळाली. खेळपट्टी गोलंदाजांना फार मदत करताना दिसत नव्हती, त्यामुळे भारतीय गोलंदाजांना लाईन लेन्थवरच लक्ष ठेवून फलंदाजाकडून चूक व्हायची अपेक्षा ठेवावी लागत होती. स्मिथ व ख्वाज यांनीही संयमी खेळ सुरू ठेवला. ख्वाजने अर्धशतक पूर्ण करताना गोलंदाजांना हैराण केले. .या मालिकेत तीन वेळा ५०+ धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने पहिल्या कसोटीत ८१ ( १२५ चेंडू) व दुसऱ्या कसोटीत ६० ( १४७ चेंडू) धावा केल्या होत्या.  Ind vs aus scorecard, Ind vs aus live  match

ख्वाजा व स्मिथ यांची २४८ चेंडूंतील ७९ धावांची भागिदारी रवींद्र जडेजाने तोडली. समालोचक या दोन्ही फलंदाजांच्या संयमी खेळीचं कौतुक करतच होते आणि तितक्यात जडेजाच्या चेंडूवर हलक्या हाताने फटका मारण्याचा प्रयत्न फसला. स्मिथच्या बॅट अन् पॅडला चेंडू घासून यष्टिंवर आदळला. स्मिथने रागात बॅट मैदानावर आपटली. तो १३५ चेंडूंत ३८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मोहम्मद शमीने डावातील दुसरी विकेट घेताना पीटर हँड्सकोम्बाला ( १७) त्रिफळाचीत केले. ऑस्ट्रेलियाने १७० धावांवर चौथी विकेट गमावली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथरवींद्र जडेजामोहम्मद शामी
Open in App