Ind vs Aus 4th test live: स्टीव्ह स्मिथशी जो नडला, त्याचा त्याने काटा...! विक्रमवीर रोहित शर्माला चतुराईनं पाठवलं माघारी, Video 

रोहित शर्माने ऑसी गोलंदाज मिचेल स्टार्कला काही सुरेख फटके मारले, पूल शॉट अन् षटकार यांच्यातले प्रेम येथेही दिसले. स्टार्कचा बाऊन्सर रोहितने पूल शॉटने प्रेक्षकांमध्ये पाठवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 10:50 AM2023-03-11T10:50:55+5:302023-03-11T10:51:21+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 4th test live scorecard Ahmedabad - Rohit Sharma dismissed for 35, he is the 2nd quickest to reach 2,000 Test runs for India at home, Video  | Ind vs Aus 4th test live: स्टीव्ह स्मिथशी जो नडला, त्याचा त्याने काटा...! विक्रमवीर रोहित शर्माला चतुराईनं पाठवलं माघारी, Video 

Ind vs Aus 4th test live: स्टीव्ह स्मिथशी जो नडला, त्याचा त्याने काटा...! विक्रमवीर रोहित शर्माला चतुराईनं पाठवलं माघारी, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 India vs Australia 4th test live score updates : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारतानेही चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहित शर्माने ऑसी गोलंदाज मिचेल स्टार्कला काही सुरेख फटके मारले, पूल शॉट अन् षटकार यांच्यातले प्रेम येथेही दिसले. स्टार्कचा बाऊन्सर रोहितने पूल शॉटने प्रेक्षकांमध्ये पाठवला. याच फटक्यासह त्याने मोठा विक्रमही नावावर केला. पण, त्यानंतर ऑसी कर्णधार स्टीव्ह स्मिथने चतुराई दाखवली अन् रोहितला माघारी पाठवले. रोहितने घरच्या मैदानावर कसोटीत २००० धावांचा विक्रमही आजच्या खेळीने नोंदवला. India vs Australia test series 

रोहित शर्माचा मोठा विक्रम! आतापर्यंत फक्त ६ भारतीयांना जमलाय हा पराक्रम


रोहित व शुबमन जोडी चांगली फटकेबाजी करताना दिसतेय. १८व्या षटकात नॅथन लाएनच्या गोलंदाजीवर गिलने पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आधी पॅडवर आदळला. त्यामुळे अपील झाले अन् ऑसींनी DRS घेतला. चेंडू प्रथम पॅडला लागल्याचे दिसले आणि इम्पॅक्टमध्ये चेंडू स्टम्प्सवर आदळताना दिसला, पण इम्पॅक्ट क्रिजपासून ३ मीटर लांब असल्याने तो नाबाद राहिला. रोहितने आजच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ हजार धावांचा टप्पा ओलांडला.  सचिन तेंडूलकर ( ३४३५७), विराट कोहली ( २५०४७), राहुल द्रविड ( २४०६४), सौरव गांगुली ( १८४३३)व महेंद्रसिंग धोनी ( १७०९२) यांच्यानंतर असा पराक्रम करणारा रोहित सहावा भारतीय ठरला. Ind vs aus 4th test match live score


 


रोहितची विकेट मिळवण्यासाठी स्टीव्ह स्मिथ सातत्याने क्षेत्ररक्षणात बदल करत होता.. स्टार्क गोलंदाजीवर असताना त्याने डीप स्क्वेअर लेगला खेळाडू उभा केला होता. त्यानंतर स्मिथने मॅथ्यू कुहनेमनला गोलंदाजीवर आणले. कुहनेमनने रोहितला बॅकफूटवर जाऊन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्यास भाग पाडले. स्मिथने त्या जागेवर मार्नस लाबुशेनला उभे केलेच होते आणि लाबुशेनने सहज झेल घेत रोहितला ( ३५)  माघारी जावे लागले. रोहितही या शॉटवर नाराज दिसला. रोहित व गिल यांची ७४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. Ind vs aus scorecard


 


फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला. उस्मान ख्वाजा ( Usman Khawaja) ने विक्रमी ४२२ चेंडूंचा सामना करताना १८० धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्याने स्टीव्ह स्मिथसह आधी ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर  कॅमेरून ग्रीनसह ( ११४)  पाचव्या विकेटसाठी २०८ धावांची विक्रमी भागीदारी केली.  ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४८० धावांवर गुंडाळला गेला.   नॅथन लाएन व टॉड मर्फी ( ४१) या जोडीने ११७ चेंडूंत ७० धावा जोडल्या.  अश्विनने शेवटची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४८० धावांत गुंडाळला. अश्विनने ९१ धावांत ६ विकेट्स घेतल्या. Ind vs aus live  match

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs aus 4th test live scorecard Ahmedabad - Rohit Sharma dismissed for 35, he is the 2nd quickest to reach 2,000 Test runs for India at home, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.