Join us  

Ind vs Aus 4th test live: विराट कोहली आजारी होता असं मला वाटलं नाही, पण... ! रोहित शर्माकडून अनुष्काच्या दाव्याची पोलखोल

India vs Australia 4th test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित राहिली.  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 5:24 PM

Open in App

India vs Australia 4th test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित राहिली.  भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नावावर केली. २०१७, २०१८-१९, २०२०-२१ आणि २०२३ मध्ये भारताने ही ट्रॉफी जिंकली.  घरच्या मैदानावरील भारताचा हा १६ वा कसोटी मालिका विजय आहे.  न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर थरारक विजय मिळवल्याने भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( WTC Final) जाण्याचा मार्ग मोकळा झाला. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २ बाद १७५ धावांवर जाहीर केला. ही कसोटी ड्रॉ राहिली आणि भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २-१ अशी जिंकली. यानंतर कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) पत्रकार परिषदेत संवाद साधला. 

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात विराटने अक्षर पटेलसह ( Axar Patel) सहाव्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. विराट ३६४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावांवर झेलबाद झाला. भारताने ९ बाद ५७१ धावा करताना ९१ धावांची आघाडी घेतली. ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी २९२ चेंडूंत १३९ धावांची भागीदारी केली. ट्रॅव्हिस १६३ चेंडूंत ९० धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २ बाद १७५ धावांवर जाहीर केला.

रोहित शर्मा म्हणाला, विराट कोहली ज्या पद्धतीने खेळला ते पाहून आनंद झाला. तो काय खेळाडू आहे हे सर्वांना माहित्येय आणि थोड्याफार इनिंग्जचा प्रश्न असतो, तो कमबॅक करतोच. त्याच्या पाठीवर कोणतं ओझं होतं, असं मला वाटत नाही. संघासाठी त्याला नेहमीच चांगली कामगिरी करायला आवडते आणि इतकी वर्ष तो हेच करत आला आहे. तो आजारी होता असंही मला वाटलं नाही, पण तो थोडं खोकत होता.''

रोहितने भारतीय जलदगती गोलंदाजांचं कौतुक केलं. ''भारतीय जलदगती गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. WTC Final मध्ये जे भारतीय गोलंदाज खेळणार आहेत, त्यांना आयपीएल दरम्यान ड्युक चेंडू सरावासाठी दिला जाणार आहे. आयपीएल दरम्यान खेळाडूंच्या वर्कलोडची आम्ही काळजी घेऊ. २१ मे पर्यंत आयपीएलमधून ६ संघ बाद होतील आणि त्या संघातील खेळाडूंना WTC Final च्या तयारीसाठी आधीच लंडनमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असेल.  सध्यातरी श्रेयस अय्यरची दुखापत ठिक दिसत नाहीए,''असेही रोहितने स्पष्ट केले. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीअनुष्का शर्मा
Open in App