Ind vs Aus 4th test live: शुबमन गिलच्या शतकाने दिवस गाजवला, २ वर्षानंतर विराट कोहलीला सूर गवसला; विक्रम नोंदवला   

India vs Australia 4th test live score updates : शुबमन गिलच्या ( Shubman Gill Century) शतकाने भारताला चौथ्या कसोटीत चांगल्या स्थितीत आणले आणि त्यात विराट कोहलीच्या अर्धशतकाने भर घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 05:05 PM2023-03-11T17:05:02+5:302023-03-11T17:05:22+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 4th test live scorecard Ahmedabad -Stumps on day 3 - India 289/3, Shubman Gill dismissed for 128 (235), Virat Kohli registered his first Test fifty in 14 months, Virat Kohli on 59* runs and Jadeja on 16* runs. | Ind vs Aus 4th test live: शुबमन गिलच्या शतकाने दिवस गाजवला, २ वर्षानंतर विराट कोहलीला सूर गवसला; विक्रम नोंदवला   

Ind vs Aus 4th test live: शुबमन गिलच्या शतकाने दिवस गाजवला, २ वर्षानंतर विराट कोहलीला सूर गवसला; विक्रम नोंदवला   

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 4th test live score updates : शुबमन गिलच्या ( Shubman Gill Century) शतकाने भारताला चौथ्या कसोटीत चांगल्या स्थितीत आणले आणि त्यात विराट कोहलीच्या अर्धशतकाने भर घातली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारताकडूनही सडेतोड उत्तर मिळाले आहे. शुबमनने शतकी खेळी करताना KL Rahulच्या कसोटीत परतण्याचा मार्ग जणू बंद करून टाकला आहे. २०२३ वर्षातील शुबमनचे हे पाचवे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. 

Ice-Cream ची मजा घेत होती 'तरुणी'! कॅमेरामनची नजर पडली बिचारी लाजली अन्... Photo Viral


ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारतानेही चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा ( ३५) व शुबमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहित बाद झाल्यानंतर शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह भारताचा डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीजारी केली. शुबमनने कसोटीतील दुसरे शतक पूर्ण करताना भारताला मजबूत स्थितीत आणले. स्टीव्ह स्मिथच्या चतुर क्षेत्ररक्षणात त्यांना धाव शोधताना संघर्ष करायला लावले. अखेर ९६ चेंडूंनंतर शुबमनने भारताला चौकार मिळवून दिली. त्याने कॅमेरून ग्रीनला दोन खणखणीत चौकार खेचले. त्यानंतर शुबमनने त्याचे शतकही पूर्ण केले. शुबमन २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२८ धावांवर बाद झाला. नॅथन लाएनने त्याला LBW केले.  


विराट कोहलीने त्यानंतर मोर्चा सांभाळताना अर्धशतक पूर्ण केले. २ वर्ष, ३ आठवडे, ४ दिवस अन् १२ इनिंग्जनंतर विराटने घरच्या मैदानावर अर्धशतक झळकावले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसरे स्थान पटकावताना वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याला मागे टाकले. सचिन तेंडुलक ६७०७ धावांसह आघाडीवर आहे, विराटने ४७२२* तर लाराने ४७१४ धावा केल्या आहेत. यासह विराटने घरच्या मैदानावर ४००० कसोटी धावांचा टप्पाही ओलांडला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ३ बाद २८९ धावा केल्या आणि विराट ५९ तर जडेजा १६ धावांवर नाबाद आहेत. भारत अजूनही १९१ धावांनी पिछाडीवर आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs aus 4th test live scorecard Ahmedabad -Stumps on day 3 - India 289/3, Shubman Gill dismissed for 128 (235), Virat Kohli registered his first Test fifty in 14 months, Virat Kohli on 59* runs and Jadeja on 16* runs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.