Ind vs Aus 4th test live : चतुर रोहित! क्षणात रणनीती बदलली अन् मोहम्मद शमीने मोठी विकेट मिळवून दिली, Video

India vs Australia 4th test live score updates : अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या तासाभरात चांगला खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:27 AM2023-03-09T11:27:26+5:302023-03-09T11:41:54+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 4th test live scorecard Ahmedabad - superb captaincy by Rohit Sharma. He brought Mohammed Shami and he gets a huge wicket of Marnus Labuschagne on his second ball, Video | Ind vs Aus 4th test live : चतुर रोहित! क्षणात रणनीती बदलली अन् मोहम्मद शमीने मोठी विकेट मिळवून दिली, Video

Ind vs Aus 4th test live : चतुर रोहित! क्षणात रणनीती बदलली अन् मोहम्मद शमीने मोठी विकेट मिळवून दिली, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 4th test live score updates : अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या तासाभरात चांगला खेळ केला. पण, ड्रिंक्सब्रेकनंतर आर अश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले. रोहित शर्माची इथे चतुर नेतृत्व पाहायला मिळाले. त्यांनी दोन्ही वेळेस गोलंदाजीत बदल केले आणि भारताला विकेट मिळाल्या.  India vs Australia test series 

भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे, परंतु अहमदाबाद कसोटी भारतासाठी जिंकणे महत्त्वाचे आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीची एन्ट्री झाली. सहाव्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिस हेडचा ( ७ धावांवर होता ) सोपा झेल यष्टिरक्षक केएस भरतने टाकला. हेड व उस्मान ख्वाजा जलदगती गोलंदाजांचा सहज सामना करत होते आणि रोहितने फिरकीपटू आर अश्विनला गोलंदाजीला आणले. पण, त्याचाही या दोघांनी खुबीने सामना केला. ( भारत- ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीचे पूर्ण धावफलक

ड्रिंक्स ब्रेकनंतर रोहितने रवींद्र जडेजाला आणले, परंतु पहिल्या षटकात त्याला ख्वाजाने चौकार खेचला. अश्विनने अखेर भारताला पहिले यश मिळवून दिले. हेडने मारलेला चेंडू जडेजाने अचूक टिपला. हेड ४४ चेंडूंत ७ चौकारांसह ३२ धावांवर बाद झाला. ६१ धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली. 


उस्मान ख्वाजा व मार्नस लाबुशेन ही जोडी आता डोकेदुखी वाढवणार असे दिसत असातना रोहितने गोलंदाजीत पुन्हा बदल केला. मोहम्मद शमीला त्याने पुन्हा गोलंदाजीला आणले अन् त्याने लाबुशेनचा ( ३) त्रिफळा उडवला. शमीने चेंडू चौथ्या विकेटवर फेकला होता, परंतु तो बॅटला लागून स्टम्पवर आदळला. लाबुशेन स्वतःच्या विकेटवर नाराज दिसला. 


 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs aus 4th test live scorecard Ahmedabad - superb captaincy by Rohit Sharma. He brought Mohammed Shami and he gets a huge wicket of Marnus Labuschagne on his second ball, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.