Ind vs Aus 4th test live: आर अश्विनचे तीन झटके, अनिल कुंबळेच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी; उस्मान ख्वाजाने रचला इतिहास, Video

कॅमेरून ग्रीन व उस्मान ख्वाजा या जोडीने पाचव्या विकेटसाठी ३५८ चेंडूंचा सामना करताना २०८ धावांची विक्रमी भागीदारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 01:52 PM2023-03-10T13:52:28+5:302023-03-10T13:53:01+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 4th test live scorecard Ahmedabad - Three wickets for Ravi Ashwin, he equals Kumble for most wickets by an Indian in BGT history, usman khawaja face Most balls by an Australian in Tests in India, Video  | Ind vs Aus 4th test live: आर अश्विनचे तीन झटके, अनिल कुंबळेच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी; उस्मान ख्वाजाने रचला इतिहास, Video

Ind vs Aus 4th test live: आर अश्विनचे तीन झटके, अनिल कुंबळेच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी; उस्मान ख्वाजाने रचला इतिहास, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 4th test live score updates :  ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीवर मजबूत पकड घेतली. कॅमेरून ग्रीन व उस्मान ख्वाजा या जोडीने पाचव्या विकेटसाठी ३५८ चेंडूंचा सामना करताना २०८ धावांची विक्रमी भागीदारी केली. भारताचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याने एकाच षटकात दोन धक्के देत रोहित शर्माच्या चेहऱ्यावर हसू परतवले. त्यानंतर आर अश्विनने आणखी एक धक्का दिला आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. अश्विनने ११ धावांत ३ फलंदाजांना माघारी पाठवले असले तरी उस्मान ख्वाजा ( Usman Khawaja) अजूनही शड्डू ठोकून उभा आहे आणि त्याने इतिहास रचला. India vs Australia test series 

कॅमेरून ग्रीनने मारले दमदार फटके; उस्मान ख्वाजासह मोडला ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् बरेच पराक्रम


ट्रॅव्हीस हेड ( ३२), मार्नस लाबुशेन ( ३) हे माघारी परतल्यानंतर ख्वाजाने एकहाती खिंड लढवली.  ख्वाजा व स्टीव्ह स्मिथ यांनी २४८ चेंडूंतील ७९ धावांची भागिदारी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. स्मिथ १३५ चेंडूंत ३८ धावांवर माघारी परतला. मोहम्मद शमीने डावातील दुसरी विकेट घेताना पीटर हँड्सकोम्बाला ( १७) त्रिफळाचीत केले. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ग्रीन व ख्वाजा यांनी ९२ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन १७० चेंडूंत १८ चौकारांच्या मदतीने ११४ धावांवर अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ग्रीन व ख्वाजा यांची २०८ धावांची भागीदारी विक्रमी ठरली. भारतातील ऑस्ट्रेलियाची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली.  अश्विनने त्याच षटकात अॅलेक्स केरीला ( ०) माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाला दोन झटके दिले. Ind vs aus scorecard


अश्विनने तिसरा धक्का देताना मिचेल स्टार्कला ( ६) बाद केले, श्रेयस अय्यरने सुरेख झेल टिपला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील ही अश्विनची १११ वी विकेट ठरली. त्याने अनिल कुंबळेच्या १११ विकेट्सची बरोबरी केली. नॅथन लाएन ११३ विकेटस आघाडीवर आहे. ख्वाजा मात्र खिंड लढवतोय आणि त्याने ४००+ चेंडूंचा सामना करताना इतिहास घडविला. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला भारतात असा पराक्रम करता आलेला नाही. यापूर्वी १९७९मध्ये ग्रॅहम यालोप यांनी ३९२ चेंडूंचा सामना केला होता.   शिवाय त्याने यालोप यांचा १६७ धावांचा विक्रमही मोडला. ख्वाजा १७०* धावांवर खेळतोय. Ind vs aus 4th test match live score


 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs aus 4th test live scorecard Ahmedabad - Three wickets for Ravi Ashwin, he equals Kumble for most wickets by an Indian in BGT history, usman khawaja face Most balls by an Australian in Tests in India, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.