India vs Australia 4th test live score updates : ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीवर मजबूत पकड घेतली. कॅमेरून ग्रीन व उस्मान ख्वाजा या जोडीने पाचव्या विकेटसाठी ३५८ चेंडूंचा सामना करताना २०८ धावांची विक्रमी भागीदारी केली. भारताचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याने एकाच षटकात दोन धक्के देत रोहित शर्माच्या चेहऱ्यावर हसू परतवले. त्यानंतर आर अश्विनने आणखी एक धक्का दिला आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. अश्विनने ११ धावांत ३ फलंदाजांना माघारी पाठवले असले तरी उस्मान ख्वाजा ( Usman Khawaja) अजूनही शड्डू ठोकून उभा आहे आणि त्याने इतिहास रचला. India vs Australia test series
कॅमेरून ग्रीनने मारले दमदार फटके; उस्मान ख्वाजासह मोडला ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् बरेच पराक्रम
ट्रॅव्हीस हेड ( ३२), मार्नस लाबुशेन ( ३) हे माघारी परतल्यानंतर ख्वाजाने एकहाती खिंड लढवली. ख्वाजा व स्टीव्ह स्मिथ यांनी २४८ चेंडूंतील ७९ धावांची भागिदारी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. स्मिथ १३५ चेंडूंत ३८ धावांवर माघारी परतला. मोहम्मद शमीने डावातील दुसरी विकेट घेताना पीटर हँड्सकोम्बाला ( १७) त्रिफळाचीत केले. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ग्रीन व ख्वाजा यांनी ९२ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन १७० चेंडूंत १८ चौकारांच्या मदतीने ११४ धावांवर अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ग्रीन व ख्वाजा यांची २०८ धावांची भागीदारी विक्रमी ठरली. भारतातील ऑस्ट्रेलियाची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अश्विनने त्याच षटकात अॅलेक्स केरीला ( ०) माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाला दोन झटके दिले. Ind vs aus scorecard
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"